शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल हॉलिडेच्या ४२ दुकानांना टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 22:28 IST

स्थानिक हॉटेल हॉलिडे रिसोर्ट परिसरातील तब्बल ४२ दुकानांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी टाळे ठोकले. ही कारवाई गुरुवारी पोलिसांच्या बंदोबस्तात व प्रशासनाच्या सहकार्याने करण्यात आल्यामुळे आता या व्यावसायिकांना आपली दुकाने बंद ठेवण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

ठळक मुद्देपर्यटन विकास महामंडळाची कारवाई : कंत्राटदाराने परवानगी न घेता केले बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक हॉटेल हॉलिडे रिसोर्ट परिसरातील तब्बल ४२ दुकानांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी टाळे ठोकले. ही कारवाई गुरुवारी पोलिसांच्या बंदोबस्तात व प्रशासनाच्या सहकार्याने करण्यात आल्यामुळे आता या व्यावसायिकांना आपली दुकाने बंद ठेवण्याशिवाय पर्याय राहिला नाही.येथील बजाज चौकात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे हॉटेल हॉलीडे रिसोर्ट आहे. हे रिसोर्ट चालविण्याचा कंत्राट पर्यटन विकास महामंडळाने १९९५ मध्ये वर्धा हॉटेल प्रा.लि. यांना दिला होता. या कंत्राटदार कंपनीने दरम्यानच्या काळात पर्यटन विकास महामंडळाची परवानगी न घेता; एक मजल्यापर्यंत बांधकाम करीत अनेक दुकानांची निर्मिती केली. तसेच ही दुकाने उपलब्ध करुन दिली. त्यामुळे या जागेवर अनेकांनी आपली दुकानदारी थाटली. याची माहिती पर्यटन विकास महामंडळाला होताच त्यांनी कारवाईची प्रक्रिया सुरु केली. तेव्हा त्यांना कंत्राटदाराने तब्बल ७ हजार ६६५ चौरस मीटर परिसरात दुकानाचे गाळे बांधल्याचे निदर्शनास आले. तसेच याच परिसरात मंगल कार्यालय वजा सभागृह बांधण्यात आल्याने काही वर्षांपूर्वी त्यावरही कारवाई करण्यात आली.आज पुन्हा पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारल्याने व्यावसायीक संकटात आले असून कंत्राटदाराच्याही पायाखालची वाळू सरकली आहे.न्यायालयाच्या आदेशाने कारवाईचा बडगापर्यटन विकास महामंडळ आणि गाळेधारकांतील हे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते. न्यायालयाने एका प्रकरणातील दोघांना ६ लाख रुपये तर दुसºया प्रकरणातील ३० जणांना ८२ लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिलेत. पण, ही रक्कम जमा केली नाही. इतकेच नाही तर पर्यटन विकास महामंडळाकडून संबंधित गाळेधारकांना नोटीसही बजावण्यात आल्या. त्याकडेही दुर्लक्ष केल्याने अखेर आज दुकानांचा ताबा घेतला.न्यायालयाच्या निदेर्शानंतरही गाळेधारकांनी रक्कम भरली नाही. ही रक्कम भरण्यासंदर्भात वारंवार नोटीस देण्यात आल्यात. पण, त्यांनी याकडेही दुर्लक्ष केल्याने ही कारवाई करण्यात आली. गाळ्यांच्या कुलूपांना सिल लावले असून, येथील मार्गही बंद करण्यात येणार आहेत. तसेच कुणी सिल तोडण्याचा किंवा रस्ता उघडण्याचा प्रयत्न केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल.-प्रशांत सवाई, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ.

टॅग्स :tourismपर्यटन