शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

जलाशयात सरासरी २१ टक्केच पाणी

By admin | Updated: April 8, 2017 00:26 IST

उन्हाचा पारा ४४ अंशावर स्थिरावत आहे. जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे.

धोक्याची घंटा : एकाने तळ गाठला, तीन मार्गावर वर्धा : उन्हाचा पारा ४४ अंशावर स्थिरावत आहे. जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. जिल्ह्यातील एका प्रकल्पाने तळ गाठला तर तीन प्रकल्प या मार्गावर आहे. लघु प्रकल्पांपैकी दोन प्रकल्प कोरडे झाले आहे. उर्वरीतही प्रकल्पांची स्थितीही नाजुक आहे. १५ मोठे व मध्यम प्रकल्पात सरासरी २१ टक्केच जलसाठा शिल्लक असल्याने ही धोक्याची घंटा आहे. जिल्ह्यातील मोठे आणि मध्यम प्रकल्प म्हणून १५ प्रकल्पांची नोंद पाटबंधारे विभागात आहे. याच विभागाकडून पाण्याची पातळी नोंदविली जाते. ही पातळी नोंदविली जात असताना यात वाढत्या तापमाणामुळे ती सतत खालावत असल्याचे समोर येत आहे. दिवसागणीक पातळीत घट होत असल्याचे दिसत आहे. या १५ प्रकल्पात सरासरी २१.६६ टक्के जलसाठा असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. या १५ पैकी मदन (उन्नई) प्रकल्पाने तळ गाठला आहे. तर पोथरा, लालनाला आणि नांद तळ गाठण्याच्या मार्गावर असल्याचे उपलब्ध जलसाठ्यावरून दिसत आहे. असे असले तरी सध्या असलेली स्थिती ही गत वर्षीच्या तुलनेत बरी असल्याचे दिसत आहे. जिल्ह्याला पिण्याचे पाणी पुरविण्याकरिता धाम प्रकल्पातील जलसाठा आरक्षित करण्यात आला आहे. या धरणात पाणी असल्याने वर्धा शहराला उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चिंता करण्याची गरज नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे. या प्रकल्पात गत वर्षीच्या तुलनेत अधिक साठा आहे. येथे यंदाच्या उन्हाळ्यात २०.२० दलघमी उपयुक्त साठा आहे. गत वर्षी तो आजच्या तारखेला १४.३९ दलघमी होता. यामुळे शहरवासीयांना पाण्याकरिता भटक्ंती करण्याची गरज नसल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.(प्रतिनिधी) पिण्याकरिता ११.२९ दलघमी पाणी आरक्षित धाम प्रकल्पातून वर्धा शहराला पाणी पुरविण्यात येते. या जलाशयात असलेल्या जलसाठ्यापैकी ११.२९ टक्के जलसाठा पिण्याकरिता आरक्षित ठेवण्यात आला आहे. यात ५.७९ दलघमी साठा नगर परिषदेकरिता तर ५.५० दलघमी पाणी जीवन प्राधिकरणकरिता राखीव ठेवण्यात आले आहे. रेल्वेकरिता ०.५३ दलघमी पाणी वर्धेतील काही जलाशयातून रेल्वे प्रशासनाकरिताही पाणी आरक्षित करण्यात आले आहे. यात ०.५३ दलघमी पाणी रेल्वेकरिता आरक्षित करण्यात आले आहे. यातील काही पाणी नुकतेच सोडण्यात आले आहे. उद्योगाकरिता २.३८ दलघमी पाणी आरक्षित जिल्ह्यात असलेल्या जलसाठ्यापैकी २.३८ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. यातील एमआयडीसीकरिता ०.४३ दलघमी तर उत्तम व्हॅल्यू कंपनीकरिता १.९५ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे.