शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आर्द्राच्या अखेरपर्यंत सरासरी २४७ मिमी पाऊस

By admin | Updated: July 5, 2017 00:22 IST

जिल्ह्यात दररोज पाऊस येत आहे. येत असलेला पाऊस नियमित नसल्याने त्याची सरासरी गतवर्षीच्या तुलनेत कमीच असल्याचे दिसून आले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत सध्या पाऊस कमीच लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात दररोज पाऊस येत आहे. येत असलेला पाऊस नियमित नसल्याने त्याची सरासरी गतवर्षीच्या तुलनेत कमीच असल्याचे दिसून आले आहे. मंगळवारला आर्द्रा नक्षत्राचा अखेरचा दिवस होता. या नक्षत्रापर्यंत जिल्ह्यात सरसरी २४७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही नोंद गतवर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले आहे. गतवर्षी जुलै महिन्यापर्यंत २५४ मिमी पावसाची नोंद झाली होती. उद्या बुधवारपासून पुनर्वसू नक्षत्र सुरू होत आहे. आद्राच्या अखरेच्या दिवशी दुपारी वर्धेत पावसाने हजेरी लावली. दोन दिवसाच्या विश्रातीनंतर हा पाऊस आला. याची मोजणी बुधवारी सकाळी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात शासनाच्या निर्देशानुसार सरासरी १,१२१ मीमी. पावसाची नोंद होणे अपेक्षित आहे. मात्र जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमीच पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात झालेली सर्वाधिक नोंद सरासरी ९२०.७१ मीमी. एवढी आहे. पावसाच्या चार महिन्यात झालेली सरासरी महत्त्वाची धरली जाते. यंदाच्या पावसाळ्यात गतवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी असले तरी कोरडे पडलेले जलसाठे भरल्याचे दिसून आले आहे. गत पावसाळ्यात या काळात जिल्ह्यातील एकूण चार जलाशय कोरडे असल्याची नोंद आहे. यंदा मात्र तसे नाही. जिल्ह्यातील सर्वच जलाशयात पाणी असल्याचे दिसून आले आहे. पावसाचे अजून दोन महिने बाकी आहेत.कोरड्या जलाशयात आले पाणी जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात गतवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी असले तरी झालेल्या पावसाने कोरड्या पडलेल्या जलाशयात पाणी आल्याचे झालेल्या नोंदिवरून दिसून आले आहे. आजच्या स्थितीत बोर प्रकल्पात १४.७६ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. धाम प्रकल्पात २०.५४, पोथरा २६.४७, पंचधारा २४.३४, डोंगरगाव १५.८९, मदन ३७.१४, मदन उन्नई ५.९७, लालनाला १२.३५, नांद १९.३४, उर्ध्व वर्धा ३५.१९, निम्न वर्धा १७.५८, बेंबळा २६.८२ तर सुकळी लघु प्रकल्पात आजच्या घडीला एकूण २५.२७ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. मंगळवारी वर्धेत ११.३४ मिमि पावसाची नोंद मंगळवारी वर्धा शहरात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली. दुपारपासून सायंकाळपर्यंत ११.३४ मिमि पावसाची नोंद झाली आहे.