शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पावणेतीन कोटींच्या मागणीला ७० हजारांची उपलब्धता

By admin | Updated: April 24, 2017 00:21 IST

आरटीई अंतर्गत २५ टक्क्यांत राखीव बालकांना विविध शाळांत मोफत प्रवेश दिला जातो.

प्रवेश शुल्काच्या प्रतिपूर्तीचे केवळ काही टक्केच शुल्क उपलब्धवर्धा : आरटीई अंतर्गत २५ टक्क्यांत राखीव बालकांना विविध शाळांत मोफत प्रवेश दिला जातो. या बालकांच्या शुल्काची प्रतिपूर्ती शिक्षण विभागाकडून केली जाते; पण यातही शासन टप्प्या-टप्प्यांचाच खेळ करीत असल्याचे दिसते. मागील वर्षीच्या प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी पावणेतीन कोटी रुपयांची मागणी असताना शासनाने केवळ ७० लाख रुपयेच उपलब्ध केल्याची माहिती आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शुल्क परताव्यातही शासन थकबाकीचेच धोरण अवलंबिणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दरवर्षी २५ टक्के प्रवेशांकरिता शाळांची नोंदणी केली जाते. यात दरवर्षी प्रवेश प्रक्रियाही राबविली जात आहे. गत वर्षी जवळपास १२० शाळांतून ही प्रवेश प्रक्रिया राबविली. यातून चार हजारांवर विद्यार्थ्यांना विविध शाळांमध्ये प्रवेश मिळाले. प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या शाळांना शुल्काची प्रतिपूर्ती शासनाकडून केली जाते. त्या अनुषंगाने यंदा शिक्षण विभागाने २ कोटी ८५ लाख रुपयांची मागणी केली; पण शासनाकडून ७० लाख ६३ हजारांचाच निधी उपलब्ध झाला. हा निधी काही टक्क्यांपर्यंतच असल्याचे सांगितले जाते. शासनाकडून निधी उपलब्ध करण्यासही कुचराई केली जात असल्याचे निदर्शनास येते. आजही काही वर्षांतील प्रवेश शुल्काची प्रतिपूर्ती बाकी आहे.(कार्यालय प्रतिनिधी) शुल्क निर्धारणानंतर निधी वाटप २०१६-१७ करीता वर्धा जिल्ह्याची मागणी २ कोटी ८५ लाख ५० हजार ९८४ रुपये आहे; पण शिक्षण संचालनालय पुणेच्या वतीने केवळ ७० लाख ६३ हजार रुपयांचाच निधी प्राप्त झाला. यात ज्यावर्षीचे पैसे त्याचवर्षी वाटायचे आहे. दरवर्षी शासनाच्या निर्णयाप्रमाणे निर्धारणानंतर शुल्क वाटप करावयाचे आहे. २०१२-१३ व २०१३-१४ मध्ये यापूर्वीच ६७ टक्के रक्कम वाटली. १४-१५ मध्ये ८७ टक्के रक्कम वाटली. सभेत दिल्या सूचना विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात समान रक्कम वितरित करण्यासाठी सरस्वती विद्या मंदिर केळकरवाडी येथे २५ टक्के प्रवेशपात्र शाळेच्या मुख्याध्यापकांची सभा घेण्यात आली. सभेला प्राथमिक शिक्षणाधिकारी के.झेड. शेंडे, उपशिक्षणाधिकारी एस.ए. हजारे, विस्तार अधिकारी, नोडल आॅफीसर उपस्थित होते. प्राप्त निधीचा विचार करता २४.७३ टक्के रक्कम आरटीजीएसद्वारे जमा करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक शाळेचे बँक खाते २५ टक्के प्रतिपूर्ती या नावे असणे गरजेचे आहे. मुख्याध्यापकांनी शुल्क रकमेची इत्यंभूत माहिती द्यावी, अशा सूचना सभेत देण्यात आल्यात.