शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

कोजागिरीत वर्धेकरांना औरंगाबादचे दूध

By admin | Updated: October 26, 2015 02:04 IST

कोजागिरीला दुधाची मागणी अधिक असल्याने बऱ्याच नागरिकांना दुधाकरिता भटकंती करावी लागते.

१५ हजार लिटरचे नियोजन : प्रत्येकाला दूध देण्याचा शासकीय यंत्रणेचा प्रयत्न रूपेश खैरी वर्धाकोजागिरीला दुधाची मागणी अधिक असल्याने बऱ्याच नागरिकांना दुधाकरिता भटकंती करावी लागते. यंदाच्या कोजागिरीला नागरिकांची भटकंती होवू नये याकरिता थेट औरंगाबाद येथून १० हजार लिटर दूध येणार असल्याची माहिती आहे. वर्धेतून केवळ जिल्ह्यातच नाही तर नागपूर येथेही दूध पुरविण्यात येणार आहे. यंदाच्या कोजागिरीला मागेल त्याला दूध देण्याकरिता शासकीय दूध शाळेच्यावतीने १५ हजार लिटर दुधाची व्यवस्था करण्यात आली आहे. गत कोजागिरीला जिल्ह्यात ११ हजार लिटर दूध विकल्या गेल्याची शासकीय नोंद आहे. असे असतानाही बऱ्याच नागरिकांना खासगी कंपनीच्या दुधाचा आधार घ्यावा लागला होता. यंदा मात्र तसे होवू नये याकरिता वाढीव व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात दूध वितरणाच्या शासकीय डेपोवरून दररोज आठ हजार लिटरचे वितरण होत आहे. यामुळे कोजागिरीकरिता नागरिकांना दूध पुरविणे यंत्रणेकरिता कसरतीचे ठरते. याकरिता कोजागिरीच्या दिवसात जिल्ह्यातील संकलन केंद्रातून आलेले अतिरिक्त दूध प्रक्रीया करून ते जपून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रक्रीया केलेले दूध तीन दिवस टिकून राहणे शक्य आहे. यात नवे दूध आल्यानंतर दूध शाळेत प्रक्रीया करून संकलित केलेले दूध ग्राहकांना देण्यात येते. यातून दररोज शिल्लक राहत असलेले दूध कोजागिरीकरिता देण्यात येते. ते कमी पडत असल्याने यंदा औरंगाबाद येथून १० हजार लिटर दुधाची मागणी करण्यात आल्याची माहिती आहे. औरंगाबाद येथील दूध वर्धेत आल्यानंतर त्यावरील प्रक्रीयेअंती पॅकींग करून ते कोजागिरीच्या दिवशी ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. वर्धेत यंदाच्या कोजागिरीकरिता नागरिकांना दूध कमी पडणार नसल्याचे शासकीय व्यवस्थेवरून दिसत आहे.