शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद एक्स्प्रेस हायवे उठलाय जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 21:29 IST

नागपूर ते औरंगाबाद हे अंतर कमी होऊन प्रवाशांचा वेळ वाचावा म्हणून पुलगाव बायपास मार्गे एक्स्प्रेस हायवे चालू करण्यात आला. परंतु या मार्गाच्या सदोष कामामुळे रस्त्याची वाट लागली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या सोयीकरिता केलेला मार्ग आता जीवघेणा ठरु लागला आहे.

ठळक मुद्देदोन दिवसात तीन अपघात : बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : नागपूर ते औरंगाबाद हे अंतर कमी होऊन प्रवाशांचा वेळ वाचावा म्हणून पुलगाव बायपास मार्गे एक्स्प्रेस हायवे चालू करण्यात आला. परंतु या मार्गाच्या सदोष कामामुळे रस्त्याची वाट लागली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या सोयीकरिता केलेला मार्ग आता जीवघेणा ठरु लागला आहे.प्रवाशांचा हिताकरिता पुलगाव बायपास मार्गे सुरु केलेल्या एक्सप्रेस हायवेचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे केले असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या कामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. परिणामी अल्पावधीतच वर्धा ते पुलगाव हा ४० किलो मीटरचा रस्ता खड्डयात गेला आहे. या मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे तयार झाले असून रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात गेल्या दोन दिवसात तीन अपघात घडले असून यामध्ये जवळपास सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. तसेच एका घराचेही नुकसान झाले असून ४ ट्रकही अपघातग्रस्त झाले आहे.कंत्राटदाराने या रस्त्याचे काम पुर्ण केल्यानंतर कुठेही अपघातग्रस्त वळण किंवा पूल असल्याबाबतचे सूचना फलक लावलेले नाही. सोबतच गावाच्याजवळ किंवा या मार्गावरील शाळांजवळ कुठेही झेब्रा क्रॉसिंग किंवा गतिरोधक लावलेले नाही. त्यामुळे रस्तेविकास महामंडळ किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मापदंडाचीही कंत्राटदाराने पायमल्ली केल्याचे दिसून येत आहे. तरिही अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने संबंधित विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.भरधाव वेगाने जाणाºया ट्रॅव्हल्सचे अनधिकृत थांबे या रस्त्यावर तयार झाले आहे. या महामार्गावरील चौरस्त्याचर ढाबे व इतर व्यावसायिक अतिक्रम करुन सौदर्याला बाधा निर्माण करीत आहे. या सर्वामुळे या रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले असून अनेकांना जीव गमवावा लागला तर काहींना कायमचे अपंगत्वही आले आहे.केंद्रातील रस्ते विकास मंत्रिपद तसेच राज्याचे अर्थ व नियोजन मंत्रिपद हे विदर्भाच्या वाट्याला आहे. त्यामुळे या कंत्राटदारावर कारवाई करुन नाचणगाव चौरस्त्यावर पोलीस चेकपोस्ट तयार करुन वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांसह प्रवासी करीत आहेत.