शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा रेल्वे स्थानकावर एटीव्हीएम

By admin | Updated: June 5, 2015 02:04 IST

प्रवासादरम्यान नागरिकांना रांगेत उभे राहून तिकीट काढण्याच्या कटकटीपासून सुटका देण्याकरिता वर्धा रेल्वे स्थानकावर एटीव्हीएम ...

वर्धा : प्रवासादरम्यान नागरिकांना रांगेत उभे राहून तिकीट काढण्याच्या कटकटीपासून सुटका देण्याकरिता वर्धा रेल्वे स्थानकावर एटीव्हीएम (आॅटोमेटीक तिकीट व्हेंडर मशीन) सुरू करण्यात आले आहे. या सुविधेचा लाभ घेण्याकरिता नागरिकांना एक शंभर रुपयांचे कार्ड रेल्वे विभागाकडून विकत घ्यावे लागणार असल्याची माहिती नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक ओ.पी. सिंह यांनी वर्धेत गुरुवारी पत्रपरिषदेत दिली. प्रवाश्यांनी विकत घेतलेल्या कार्डपैकी ५० रुपये त्यांना प्रवासाकरिता मिळतील व ५० रुपये रेल्वे विभागाच्या खात्यात जातील. हे कार्ड एक वर्षाकरिता राहील. सदर कार्डचे नुतनीकरण ५० ते ५०० रुपयांपर्यंत करता येणार आहे. यात दीडशे किलोमिटरच्या प्रवासादरम्यान प्रवाश्याला ५ टक्के सुट देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सोबतच यावेळी विविध योजनांची माहितीही त्यांनी दिली. २८ मेपासून रेल्वे प्रवासी पंधरवडा सुरू झाला आहे. हा पंधरवडा येत्या ९ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. या दरम्यान वर्धा रेल्वे स्थानकावर असलेल्या प्रवाश्यांकडून त्यांच्या सूचना त्यांनी जाणून घेतल्या. त्यांच्याकडून अर्जही भरून घेतले. यात रेल्वे विभागाकडून असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार असल्याची माहिती माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक संमुत देऊळकर, वरिष्ठ विभागीय अभियंता एच.एन. कावरे, प्रसिद्धी अधिकारी आर. डी.पाटील यांच्यासह वर्धेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)वर्धा रेल्वे स्थानकावर एमएफसी वर्धा रेल्वे स्थानकावर प्रवाश्यांना त्रास होणार नाही व त्यांना सर्वच सुविधा पुरविण्याकरिता स्थानकावर एमएफसी (मल्टी फंक्शन कॉम्प्लेक्स) बांधण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच्या कामाला लावकरच सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सिंदी (रेल्वे) येथे असलेल्या फाटकामुळे नागरिकांना त्रास होत आहे. यामुळे नवे फाटक तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. पुलगाव येथील रेल्वे फाटकाजवळ असलेल्या अतिक्रमणामुळे त्याचा विस्तार करणे अडचणीचे जात आहे. यावर उपाय योजना आखण्यात येत असल्याचे सिंह यावेळी म्हणाले. बजाच चौक परिसरात असलेल्या उड्डाण पुलाची रूंदी वाढविण्याच्या प्रस्तावाला रेल्वे प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आल्याचेही त्यावेळी सांगण्यात आले. नागपूर-यवतमाळ रेल्वे मार्गाला जमीन अधिग्रहणाचे ग्रहण नागपूर-यवतमाळ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली आहे. त्याचे काम सुरू आहे. मात्र काही ठिकाणी जमीन अधिग्रहण करण्यात अडचणी येत असल्याने त्याचे काम रखडले आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यास व्यापाराच्या दृष्टीने व प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने त्याचा लाभ होणे शक्य आहे. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यंदाचे उदिष्ट १ लाख ८० हजार कोटी रुपयांचे गत हंगामात रेल्वे विभागाची कमाई १ लाख ७५ हजार कोटी रुपये झाली आहे. ही कामाई प्रवाश्यांना मिळत असलेल्या सेवेचा पुरावा आहे. प्रवाश्यांच्या सेवा वाढविताना यंदाच्या सत्रात वाढ करून १ लाख ८० हजार कोटी रुपयांचे उदिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.