शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

वायगाव गटाच्या निवडणुकीकडे दिग्गजांचे लक्ष

By admin | Updated: February 11, 2017 00:53 IST

जि.प. सर्कलच्या नव्याने झालेल्या रचनेनंतर वायगाव (नि.) गटात सिरसगाव (ध.), आजगाव, वडद, सेलसुरा, पडेगाव,

विनोद घोडे   चिकणी (जा.) जि.प. सर्कलच्या नव्याने झालेल्या रचनेनंतर वायगाव (नि.) गटात सिरसगाव (ध.), आजगाव, वडद, सेलसुरा, पडेगाव, चिकणी (जा.), धोत्रा (रे.) अशी आठ गावे जोडण्यात आली. यात वायगाव (नि.) आणि पडेगाव असे दोन गण करण्यात आले आहे. या गटातील व गणातील लढती खासदार व आमदारांसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पडेगाव गण हा महिला अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. वर्धा पंचायत समितीचे सभापती पद महिला अनुुसचित जातीकरिता राखीव असल्याने सर्व दिग्गजांच्या नजरा या गणाकडे लागल्या आहे. पडेगाव गणाकरिता भाजपकडून रूपाली राहुल येसनकार यांना उमेदवारी देण्यात आली तर कॉँग्रेसने भिमा इंदल नाखले यांना उमेदवारी दिली आहे. या दोन्ही उमेदवार स्थानिक असून तसेच बसपाकडून लता प्रमोद डोंगरे या रिंगणात आहे. येथे तिहेरी लढतीचे चित्र आहे. राजकीय पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराचा प्रारंभ केला आहे. दोन्ही पक्षांकडून दिग्गज नेते येथे सभा घेत आहे. त्यामुळे येथील लढाई प्रतिष्ठेची असल्याचे बोलले जाते. प्रचार यंत्रणा झपाट्याने कामाला लागली असून प्रत्येक उमेदवाराने प्रचारात आघाडी घेतली आहे. वायगाव (नि.) गट हा खुल्या प्रवर्गासाठी असल्याने येथील लढती लक्षवेधी होण्याची चिन्हे आहे. या गटात दिग्गज उमेदवार रिंगणात आहे. अपक्ष उमेदवार किती मत घेतील यावर बरेच काही चित्र अवलंबून आहे. वायगाव गटात अपक्ष उमेदवारांची संख्या अधिक असल्याने येथे बहुरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.