शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांकडे जनतेचे लक्ष

By admin | Updated: October 27, 2016 00:45 IST

जिल्ह्यातील सहा नगर पालिकांच्या निवडणुका येत्या २७ नोव्हेंबर रोजी होऊ घातल्या आहे. नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख जवळ येत असली तरी...

राजकीय पक्षांची माथापच्ची : तिकिटासाठी इच्छुकांचे मुंबईत ठाणवर्धा : जिल्ह्यातील सहा नगर पालिकांच्या निवडणुका येत्या २७ नोव्हेंबर रोजी होऊ घातल्या आहे. नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख जवळ येत असली तरी अद्याप एकाही राजकीय पक्षाने आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला नाही. सर्वच राजकीय पक्षांकडे इच्छुकांची यादी मोठी असल्यामुळे नेमकी कुणाला उमेदवारी द्यावी, यावरून पक्षश्रेष्ठींची पाथापच्ची सुरू असल्याची माहिती आहे.नगराध्यक्षपदाची निवड थेट जनता निवडणुकीच्या माध्यमातून करणार असल्यामुळे या निवडणुकीला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातही वर्धा व हिंगणघाट सर्वसाधारण तर पुलगाव येथे हे पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने अनेकांना नगराध्यक्षपदाचे स्वप्न पडू लागले आहे. राजकीय पक्षाची तिकीट मिळाल्यास हा राजयोग सोपा होईल, ही बाब लक्षात घेऊन पक्षातील मंडळींसह इतरही मंडळींनी राजकीय पक्षांकडे तिकीट मागून फिल्डींग लावणे सुरू केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, काही राजकीय पक्षांकडे नगराध्यक्षपदाचा दमदार उमेदवार नसल्यामुळे पश्रक्षेष्ठी नव्या चेहऱ्यांना चाचपडून बघत असल्याची माहिती आहे. यामुळे उमेदवारीचा तिढा सुटता-सुटत नसल्याचे समजते. दुसरी बाब म्हणजे, आधीच उमेदवार जाहीर केल्यास बंडखोरीची शक्यता अधिक आहे. हा धोकाही राजकीय पक्ष पत्करण्यास तयार नसल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. राजकीय पक्षांचे उमेदवार मुंबईत ठरणार असल्यामुळे जवळपास सर्वच प्रमुख पक्षांकडील इच्छुकांनी मुंबईत ठाण मांडले आहे. कोणत्या पक्षाकडून कुणाला उमेदवारी मिळणार, याकडे जनतेचे बारीक लक्ष आहे.(जिल्हा प्रतिनिधी)