शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गृहरक्षक दिल्लीत जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:05 IST

शासनाने नवा निर्णय अंमलात आणून तब्बल ५४ हजार गृहरक्षकांना कामावरून कमी केले.

शासनाचा निषेध : बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनच्या बैठकीत निर्णयलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाने नवा निर्णय अंमलात आणून तब्बल ५४ हजार गृहरक्षकांना कामावरून कमी केले. यात वर्धेतील भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी गृहरक्षकांच्या आंदोलनादरम्यान बोळवण केल्याचा आरोप बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनच्यावतीने करण्यात आला. सोमवारी वर्धेत झालेल्या बैठकीत शासनाच्या या दुटप्पी धोरणाच्या विरोधात गृहरक्षकांनी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गृहरक्षकांवर शासनाच्या निर्णयामुळे अन्याय झाल्याचा आरोप करीत फेडरेशनच्यावतीने झाशी राणी चौक परिसरात आज सभा घेण्यात आली आहे. या सभेला फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष एस.एम. ठमके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सभेच्या पहिले एका रॅलीचे आयोजन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जात अतिथींच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यानंतर सभेला प्रारंभ झाला. या सभेत विविध विषयावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या धरणे आंदोलनात बहुजन समाज पार्टी, आंबेडकरवादी रिपब्लीकन पार्टी, समता सैनिक दल, डॉ. आंबेडकर स्ट्रगल्स असोसिएशन आॅफ इंडिया आणि रिपब्लीकन एम्प्लॉईज फेडरेशन आॅफ इंडियासह अनेक संघटनांचा पाठींबा होता. आंदोलनातून १२ ते २१ वर्षानंतर गृहरक्षकांची सेवा समाप्त करणारा शासन निर्णय व महासमादेशकांची परिपत्रके रद्द करावी. प्रवर्तनातील मुंबई गृहरक्षक अधिनियम १९४७ च्या तरतुदी बरहुकूम वयाच्या ५५ वर्षापर्यंत देशसेवा करण्याच्या संधीचे रक्षण करणे, दर ३ वर्षानंतर गृहरक्षकांच्या पुनर्नियुक्तीचे गैरसंविधानिक प्रयोजन कायमस्वरूपी रद्द करणे, वर्षातील संपूर्ण ३६५ दिवसाचा बंदोबस्ताचे रक्षण करणे, ३६५ दिवसाचे मानधन देवून त्यांच्या देशभक्तीच्या भावनेचा सन्मान करणारा निर्णय घेणे, गृहरक्षकांना मिनीमम वेज अ‍ॅक्टनुसार मानधन देणारा सन्मानजनक कायदा पारीत करण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. राज्यात शांतता व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे गृहरक्षकांना सुद्धा सर्व भत्ते व संविधानिक कायद्याच्या चौकटीत अनुज्ञेय असणाऱ्या सोयी व सुविधा देणे, पोलीस प्रशासनातील रिक्त पदे शैक्षणिक पात्रता व अनुभवाच्या आधारे भण्याची मागणी यावेळी राज्य शासनाला करण्यात आली.