शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बनावट धनादेशाद्वारे रक्कम काढण्याचा प्रयत्न फसला

By admin | Updated: May 9, 2016 02:06 IST

धनादेशावर बनावट स्वाक्षरी करून खात्यातून परस्पर १५ लाख रूपये काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. नालवाडी येथे शनिवारी ही घटना उघडकीस आली.

१५ लाखांचा धनादेश : बँकेच्या सतर्कतेने अनर्थ टळला वर्धा : धनादेशावर बनावट स्वाक्षरी करून खात्यातून परस्पर १५ लाख रूपये काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. नालवाडी येथे शनिवारी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नालवाडी येथील नरेंद्र विठ्ठल उमाटे यांच्या नावे बॅँकेत असलेल्या खात्याचा धनादेश प्राप्त करून शीतल उमाटे व अजय भुते यांनी धनादेशावर बनावट स्वाक्षरी केली. त्यांच्या खात्यातून १५ लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला. बॅँकेतील अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी बनावट असल्याचे लक्षात येताच त्यांनी धनादेश विड्राल न करता नरेंद्र उमाटे यांच्याशी संपर्क केला असता सर्व प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी नरेंद्र उमाटे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी शीतल उमाटे व अजय भुते यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)दारूविक्रीची माहिती दिल्यावरून महिलेला शिवीगाळवर्धा- दारूचा गाळप करून विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना दिल्याच्या कारणावरून सुमित्रा कुरवाडे रा. सुकळी (बाई) या महिलेला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत सुमित्राने दिलेल्या तक्रारीवरून सावंगी पोलिसांनी विलास पारिसे, सुनील पारिसे, उत्तम पारिसे सर्व रा. सुकळी (बाई) या तिघांवर गुन्हा दाखल केला. ही घटना शनिवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. शेतीच्या वादातून मारहाणकारंजा (घाडगे)- शेतीच्या वादातून देवाजी मानमोडे यांना तुकाराम मानमोडे, हेमराज मानमोडे व ईश्वर मानमोडे या तिघांनी मारहाण करून जखमी केले. ही घटना कारंजा तालुक्यातील सावल येथे शनिवारी रात्री घडली. सदर तिघांनी देवाजी यांना शेतात बांधून लाथा बुक्यांनी मारहाण करून जखमी केले. भरधाव वाहन चालविण्यावरून वादवर्धा- रस्त्याने जाताना वाहनाला साईड देण्याच्या कारणावरून उद्भवलेल्या वादात मेटॅडोर चालकाला दुचाकीस्वाराने मारहाण करून जखमी केले. ही घटना सिंदी (रेल्वे) बस स्थानक परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. राजू बिजवार यांच्या तक्रारीवरून बबलू इंदर चंद्रावत याच्यावर कलम ३४१, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.