शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१.६५ लाख शिधापत्रिकाधारक आधारशी संलग्न

By admin | Updated: July 12, 2017 02:02 IST

प्रत्येक व्यवहाराकरिता आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्डाशिवाय लाभ मिळणे कठीण असल्याने जिल्ह्यातील

महेश सायखेडे । लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : प्रत्येक व्यवहाराकरिता आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्डाशिवाय लाभ मिळणे कठीण असल्याने जिल्ह्यातील १ लाख ८५ हजार ५१५ पैकी १ लाख ६५ हजार ६९४ नागरिकांनी त्यांचे आधार कार्ड शिधापत्रिकेशी संलग्न केले आहे. उर्वरीत नागरिकांना त्यांचे आधार कार्ड शिधापत्रिकेशी संलग्न करण्यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. शिधापत्रिका धारक असलेल्या गरजू कुटुंबीयांना शासनाच्यावतीने विविध योजनांच्या माध्यमातून धान्यसाठा वितरीत केल्या जातो. ज्या गरजू कुटुंबियांकडे घरगुती वापराचे सिलिंडर नाही त्यांना शासनाच्यावतीने केरोसीनही पुरविल्या जात आहे. या योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याकरिता ६७ हजार ४१० क्विंटल धान्याचे आवंटन प्राप्त होते. स्वस्त धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता रहावी यासाठी जिल्हा पुरवठा विभाग प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यात प्राधान्य गट योजनेंतर्गत १ लाख ५५ हजार ८६१ प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांना लाभ मिळतो. अंत्योदय अन्न योजनेंतर्गत ४४ हजार २४१ अंत्योदय शिधापत्रिका, एपीएल शेतकरी योजनेंतर्गत ४९ हजार ३५८ गरजु कुटुंबियांना धान्य वितरीत करण्यात येत आहे. अन्नपूर्णा योजनेत जिल्ह्यात १ हजार ४५१ लाभार्थी असून त्यांना साठा उपलब्धतेनुसार गहु किंवा तांदुळ १० किलो अथवा पाच किलो गहु व पाच किलो तांदुळ मोफत दिल्या जात आहे. सदर धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता यावी तसेच खरे लाभार्थी सहज शोधता यावे यासाठी शिधापत्रिका धारकांना आपला आधार संलग्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत असलेल्या जिल्ह्यातील ८९ टक्के शिधापत्रिका धारकांनी सध्यास्थितीत आधार संलग्न केल्याचे सांगण्यात आले. उर्वरित १९ हजार ८२१ शिधापत्रिका धारकांचे आधार संलग्न करण्यासाठी पुरवठा विभाग प्रयत्नरत आहे. जुलै महिन्याचे आवंटन जुलै महिन्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाला प्राधान्य गट योजनेच्या लाभार्थ्यांसाठी २३ हजार ५४० क्विंटल गहू व १५ हजार ६९० क्विंटल तांदूळ, अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ८ हजार ९६० क्विंटल गहू व ६ हजार ७२० क्विंटल तांदूळ व एपीएल शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ७ हजार ५०० व ५ हजार क्विंटल तांदूळ तसेच ४३२ क्विंटल साखर प्राप्त झाली असल्याचे सांगण्यात आले.