शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांपासून एटीपी केंद्र बंद

By admin | Updated: July 18, 2016 00:40 IST

वीज ग्राहकांना बिल भरताना अधिक त्रास होऊ नये म्हणून महावितरणने एटीपी केंद्र सुरू केले;

ग्राहकांत असंतोष : बिल भरताना अडचणी हिंगणघाट : वीज ग्राहकांना बिल भरताना अधिक त्रास होऊ नये म्हणून महावितरणने एटीपी केंद्र सुरू केले; पण गत सहा महिन्यांपासून शहरातील हे केंद्र बंद आहे. परिणामी, वीज ग्राहकांना बिल भरताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. शहरातील सुभाष चौक येथे महावितरणने वीज बिल भरण्यासाठी एटीपी केंद्र सुरू केले; पण ते सहा महिन्यांपासून बंद आहे. ते कुलूपबंद अवस्थेत असल्याने ग्राहकांना आल्या पावली परत जावे लागते. यात वीज ग्राहकांची गोची होत असून असंतोष पसरला आहे. सदर केंद्र सुरू करावे, या मागणीसाठी अनेकदा निवेदने दिली; पण अद्याप कार्यवाही करण्यात आली नाही. ते केंद्र कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना याचा अधिक फटका बसत आहे. ग्राहकांना पारदर्शक व चांगली सेवा देता यावी म्हणून वीज कंपनीने ही एटीपी सुविधा अनेक शहरांत उपलब्ध केली होती, हे विशेष! वीज ग्राहकांना लांबलचक रांगेपासून काही प्रमाणात मुक्तता मिळाली होती. ही सुविधा आता बंद असल्याने बिल भरताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष देत एटीपी केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी) वीज वितरण कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एटीपी मशीनची सुविधा उपलब्ध करून अत्यंत कमी वेळात वीज देयक अदा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. या केंद्राची वेळही ग्राहकांना सोयीची वाटत असल्याने सदर केंद्राची उपयोगिता सिद्ध झाली. ही सुविधा वीज ग्राहकांच्या पसंतीस उतरली असताना सहा महिन्यांपासून सदर केंद्रच बंद आहे. आता तर त्याला कुलूपच लावण्यात आले आहे. यामुळे चांगल्या सुविधेला वीज ग्राहक मुकले आहेत. अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे चांगल्या योजनांचा फज्जा उडतो.