शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

एटीएमच्या ‘नो कॅश’ने नागरिक त्रस्त

By admin | Updated: April 13, 2017 01:33 IST

नोटाबंदीच्या निर्णयाला चार महिन्यांचा कालावधी लोटला तरीही एटीएमची व्यवस्था अद्याप सुरळीत झालेली नाही.

जिल्ह्यातील अनेक एटीएम बंदच : शेतकरी, व्यापारी व चाकरमान्यांना मनस्ताप वर्धा : नोटाबंदीच्या निर्णयाला चार महिन्यांचा कालावधी लोटला तरीही एटीएमची व्यवस्था अद्याप सुरळीत झालेली नाही. त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरातील बहुतांश एटीएम केंद्र बंद असतात. हीच परिस्थिती ग्रामीण भागातही असल्याने एटीएम केंद्र कधी सुरळीत होईल याची ग्राहकांना प्रतीक्षा आहे. शासनाने एटीएमच्या व्यवहारावर मर्यादा आणल्या आहे. महिन्याभरात ठराविक व्यवहारवर सवलत दिली आहे. असे असताना एटीएम बंद राहत असल्याने ग्राहकांना नाहक भुर्दंड सोसावा लागतो. बँकेकडे तक्रार करुनही एटीएम सुरू करण्यात येत नाही, असे ग्राहक सांगतात. अनेकदा एटीएम बंद असल्याने ग्राहकांना शहरभर भटकंती करावी लागते. त्यातही एखादे एटीएम केंद्र सुरू असेल तर तेथे ग्राहकांच्या रांगा असतात. यात वेळ आणि श्रम व्यर्थ जातात. बँकाच्या या कार्यप्रणालिविषयी ग्राहकांत संताप व्यक्त होत आहे. खासगी आणि राष्ट्रीयकृत बँकांचे एटीएम केंद्र सर्व प्रमुख चौकात आहेत. मात्र कुठलाही सण किंवा उत्सव असला की, हे एटीएम केंद्र बंद असतात. अशात कोणत्याही केंद्रावर गेले तरी रिकाम्या हातानेच परतावे लागते. यामुळे ग्राहकांना आर्थिक व्यवहारात करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बहुतांश एटीएमवरुन आजही दोन हजाराचीच नोट मिळते. साधारण व्यवहार करताना सुटे पैसे देण्याचा प्रश्न असतो. यात ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)