शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
4
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
5
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
6
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
7
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
8
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
9
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
10
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
11
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
12
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
13
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
14
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
15
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
16
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
17
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
18
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
19
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश

शहद विक्रीतूनही लागतोय उदरनिर्वाहाला हातभार

By admin | Updated: December 26, 2015 02:14 IST

ऊस तोडणीच्या कामासाठी तालुक्यात असंख्य मजूर आले आहेत. या कामांतून मिळणारा वेळ व्यर्थ जाऊ नये म्हणून एका ....

धडपड जगण्याची : ऊ स तोडणी कामगाराने केला उर्वरित वेळेचा सदुपयोगविजय माहुरे सेलूऊस तोडणीच्या कामासाठी तालुक्यात असंख्य मजूर आले आहेत. या कामांतून मिळणारा वेळ व्यर्थ जाऊ नये म्हणून एका मजुराने थेट शहद (मध) विक्रीचा व्यवसाय अंगिकारला आहे. दररोजच्या चटणी-मिठाला हातभार लागावा म्हणून मजुराने ही धडपड चालविली आहे. कोटंबा शिवारात ऊस तोडणीवर असलेल्या एका कामगाराने सेलू येथील पंचायत समिती कार्यालयासमोर सहद विकण्यास आणले होते. गावकरी शहद म्हणून अनेकांनी ते घेतले. त्याला नाव विचारले असता सांगितले नाही; पण पुसद जवळील वसंतपूर येथील रहिवासी असून पती-पत्नी दोघेही ऊस तोडणीसाठी आल्याचे समजले. ऊस तोडणीची ‘अ‍ॅडव्हांस’ रक्कम आम्ही दिवाळीतच घेतली. ती खर्च झाली. ऊस तोडणी करताना जनावरांना लागणारा चारा (वाळे) आम्ही विकतो. त्यावर आमचा इथला खर्च भागवित असतो; पण ऊसाच्या सभोवताल मधमाश्याचे पोळे बहुदा सापडतात. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस ऊस तोडणीतून वेळ मिळताच शहद विक्री करतो. यापासून ३०० ते ४०० रुपये मिळतात. यावर आठवड्याचा तेल-मिठाचा खर्च भागतो. काम करून थकवा येतो; पण हेच दिवस पैसा कमविण्याचे असतात. हा वेळ आपण व्यर्थ घातला तर कसे होणार, असे तो ऊस तोडणी कामगार सांगतो.शेतमजूर असो वा ऊस तोडणी कामगार, सतत श्रम करीत राहणे, हे त्यांच्या प्रारब्धी आहे. यामुळे जेथून दोन पैसे कमविता येतील व संसाराचा गाडा चालविण्यास मदत होईल, त्यासाठी सातत्याने धडपड सुरू असते. ती जिद्द, चिकाटी आणि त्यांची व्यथा ऐकल्यानंतर जगण्यासाठी सर्व काही हालअपेष्टा झेलाव्या लागतात, हे दिसते. ऊस तोडणी कामगारांना कामावर आणण्यासाठी दिवाळीतच अ‍ॅडव्हांस पेमेंट केले जाते. ऊस तोडणीच्या मजुरीतून दिलेले पैसे कपात केले जातात. यामुळे येथील खर्च भागविण्यासाठी मजुरांची धडपड सुरू असते.अ‍ॅडव्हांसची रक्कम होते दिवाळीतच खर्चसाखर कारखाने सुरू झाला की, ऊस लागवडीच्या क्षेत्रात वाढ होते. सेलू तालुक्यातही ऊस लागवडीचे क्षेत्र वाढल्याने तोडणीचे कंत्राट दिले जाते. तालुक्यात बहुतांश ऊस तोडणी कामगारांना आधीच अ‍ॅडव्हांस दिला जातो. ही रक्कम कामगारांना दिवाळीपूर्वीच मिळत असल्याने त्यांचा सण साजरा होतो; पण प्रत्यक्ष ऊस तोडणी करीत असताना उदरनिर्वाह करणे अवघड होते. परिणामी, या कामगारांना अन्य पर्याय शोधावे लागतात. असाच मध विक्रीचा पर्याय एका ऊस तोडणी कामगाराने निवडला आहे. ऊसाची तोडणी करीत असताना मधमाशांचे पोळ मिळतात. यातूनच शहद (मध) काढून त्याची विक्री केली जाते.