शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीची चाहुल

By admin | Updated: July 19, 2014 01:38 IST

विधानसभा निवडणुकीचा बिगुल केव्हाही वाजु शकतो.

मतदार नोंदणीवर भर : जिल्हाधिकाऱ्यांची माहितीवर्धा : विधानसभा निवडणुकीचा बिगुल केव्हाही वाजु शकतो. या अनुषंगाने निवडणूक आयोग्याच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. या निवडणुकीसाठी मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण करण्यात येणार आहे. यात मतदार नोंदणीसह मतदार याद्यांमधून नाव गहाळ झाले, गाव बदलले, नावातील चुका यासह अनेक बाबींची पूर्तता केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एन.नवीन सोना यांनी दिली.वर्धा जिल्ह्यात चार विधानसभा मतदार संघ आहे. या क्षेत्रात ही प्रक्रिया राबिवली जाणार आहे. नामांकन भरण्याच्या दहादिवसांआधीपर्यंत मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. कुणाची नावे चुकीने वगळली असेल तर ती नावेही समाविष्ट केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाकडे या अनुषंगाने १५ हजार तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी १४ हजार ८८७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत नवमतदारांची अधिक नोंद करण्यासाठीही विशेष मोहीम राबविली जाणार आहे. तसेच महिलांसाठी अशाच प्रकारे शहर गावपातळीवर मोहीम राबविली जाणार आहे. यासोबतच तरुणवर्ग आणि महिला वर्गांचा मतदानाचा टक्का वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. सीईओ.महाराष्ट्र.जीओव्ही.आयएन या संकेतस्थळावरही मतदार नोंदणी व चुकांची दुरुस्ती करण्याची सोय आहे. मतदार यादीत नाव आहे, मात्र त्यांचे ओळखपत्र अद्याप तयार झालेले नाही, ती प्रक्रियासुद्धा पार पाडली जाणार आहे. चारही विधानसभा क्षेत्रात सद्य:स्थितीत १० लाख २० हजार १६२ मतदार आहेत. यामध्ये ५ लाख ३१ हजार ७६४ पुरुष तर चार लाख ८८ हजार ३९१ महिला मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात छायाचित्र ओळखपत्राची टक्केवारी ९२.३५ इतकी आहे. सर्वाधिक ९७.२२ टक्के हिंगणघाट विधानसभा क्षेत्र तर सर्वात कमी ८६.३६ टक्के वर्धा विधानसभा क्षेत्रातील आहे. एकंदर ९ लाख ३७ हजार १४७ मतदारांकडे छायाचित्र असलेले ओळखपत्र आहे, तर ८३ हजार १५ मतदारांकडे अद्यापही छायाचित्र असलेले ओळखपत्र नाही. ओळखपत्र असूनही मतदार यादीत नाव नसेल तर मतदान करता येणार नाही, तेव्हा प्रत्येक नागरिकाने मतदार नोंदणी करण्याचे आव्हानही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश मेश्राम उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)