शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याचा मृत्यू ही व्यवस्थेने केलेली हत्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:14 IST

सिंचनाच्या नावाखाली वेगवेगळ्या प्रकल्पांतून शेतकऱ्यांची झालेली दुर्दशा सर्वश्रूत आहे. ही दूर्दशा दूर सारण्यासाठी या शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. येथील निकाल त्यांच्या बाजूने लागतात; पण शासन त्याला जुमानात नसल्याने अनेकवेळा समोर आले आहे.

ठळक मुद्देशैलेश अग्रवाल यांचा आरोप : वर्धा न्यायालयात जमीन अधिग्रहण सुनावणी दरम्यान विश्वास शिरपूरकर यांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सिंचनाच्या नावाखाली वेगवेगळ्या प्रकल्पांतून शेतकऱ्यांची झालेली दुर्दशा सर्वश्रूत आहे. ही दूर्दशा दूर सारण्यासाठी या शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. येथील निकाल त्यांच्या बाजूने लागतात; पण शासन त्याला जुमानात नसल्याने अनेकवेळा समोर आले आहे. असाच लढा देताना कारंजा तालुक्यातील प्रकल्प ग्रस्त विश्वास शिरपूरकर यांचा न्यायालयात हृदयविकाराने मृत्यू झाला. हा मृत्यू नसून व्यवस्थेने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याची केलेली हत्याच असल्याचा आरोप शेतकरी आरक्षणाचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांनी केला आहे.निम्न वर्धा प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांच्या वेदना अनेक आहेत. १९९८ च्या सुमारास या प्रकल्पासाठी जमीन संपादीत झाली. २००३-०४ च्या दरम्यान अंतिम निवाडा पारीत झाला. २००६-०७ च्या सुमारास अंतिम निवड्याप्रमाणे सरासरी १५ हजार रुपये प्रती एकर प्रमाणे मोबदला देवून जमिनी ताब्यात घेण्यात आल्या. शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना शेती आणि घरापासून बेदखल करण्यात आले. बहुतांश लोकांना मिळालेला मोबदला कर्जाच्या परतफेडीतच गेला. काही सुज्ञ कोर्टात गेले. त्यांचा मोबदला न्यायिक प्रक्रियेत गेला. काहींनी त्यातून अर्धवट घरे बांधून घेतली व कसेबसे दुरावस्थेतील पुनर्वसन वसाहतीत येवून आपला संसार थाटला. काही दुरावस्थेत शेड मध्ये आले तर काही भाड्याच्या घरात जवळच्या शहरांमध्ये स्थलांतरीत झालेत. रक्कम आली पण शेती गेल्याने उदरनिर्वाहाची समस्या समोर उभी ठाकली. शेतीची सवय असलेल्या काही शेतकऱ्यांनी दुसरे काही जमत नाही असे म्हणत आलेल्या रकमेतून उदरनिर्वाह केला. काहींनी सुखचैनीच्या वस्तू खरेदी केल्या. यात रकमा गेल्याने आवक शून्य झाली. खर्च वाढतच जातात, या ना त्या प्रकारे ही रक्कम केव्हाच संपली. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा एक मोठा समाज अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत सुविधांनाही मुकला. मोठ्या प्रमाणात शेतकरी बेरोजगार झाला. काही काळातच शेतकरी शेतमजूर झाला. २००६ ते २०१६ चालत असलेल्या या न्यायालयीन प्रक्रियेत अनेक गुंतागुंती झाल्यात. कायदेशीर कार्यवाहींना सामोरे जाऊन साक्षीदार, कागदोपत्री पुरावे पुरविणे वकिलांशी व अधिकाऱ्यांशी बोलणी घालणे या सर्व विषयांचे समन्वय जुळवणे अधीर झालेल्या, परिस्थितीशी झुंज देणाऱ्या अशिक्षित शेकऱ्यांना शक्य आहे काय? तुम्ही तुमच्या उपजीविकेचे साधन व राहते घर विकून २०-२५ वर्ष त्याच्या मोबदल्यासाठी वाट पाहत जगू शकाल काय? ज्यांनी कोर्टात दादच मागितली नाही किवा ज्यांचे खटले तांत्रिक चुकिंमुळे निरस्त झाले त्यांचे काय? प्रकल्पांच्या समस्यांशी झुंज देताना अनेक प्रकल्पग्रस्तांनी जीव गमावले आहेत; पण या अभागी मरणाची नोंद सुद्धा घेण्याइतकी संवेदनशीलता आजच्या धोरणकर्त्यांमध्ये नाही, असा आरोप अग्रवाल यांनी केला आहे.निकालानंतरही समस्या कायमचनगण्य प्रमाणात किवा काही प्रमाणात कोर्टाने मागण्या मान्य केल्यास प्रशासनाकडून वषार्नुवर्षे ती रक्कम अदा करण्यात येत नाही. जप्तीची कार्यवाही दिल्यास शासनातर्फे अपील करण्यात येते व पुन्हा दिरंगाई करून शेतकऱ्यांना त्रस्त करण्यासाठी सर्व न्यायिक रणनीतीचा गैरवापर करण्यात येतो. या उपरही शासनाला अपिलेट कोर्टात अपील दाखल होण्याआधी पैसे भरण्याचे निर्देशित केल्यास शेवटल्या क्षणापर्यंत अगदी महिनो गिनती ते वर्षानुवर्ष रक्कम जमा केल्या जात नाही. रक्कम जमा झाल्यावरही कोर्टाकडून पैसे मिळवण्यासाठी शेतकºयांना उच्च न्यायालयाच्या महागड्या वकीलांची वेगळी फी दिल्याशिवाय वकील पुढची कार्यवाही करत नाही. त्यानंतर कोर्टाद्वारे सोल्वंसी मागितली जाते. संपूर्ण मालमत्ता संपादनात गेलेल्या हवालदिल शेतकºयांनी ती आणायची कोठून? कोणी नातेवाईक जुळले तर ठीक नाही तर वर्षानुुवर्षे पुन्हा या उच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत तो त्याच्याच पैशाला मुकलेला, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचेही अग्रवाल यांनी म्हटले आहे.२० वर्षांपासून तारीख पे तारीखनिम्न वर्धा प्रकल्प आम्हा प्रकल्पग्रस्तांचे समाधीस्थळ झाले असून सुमारे २० वर्षांपासून मोबदल्याच्या वसुलीसाठी तारीख पे तारीख शेतकरी स्मशानाची वारी करतोय. घर, जमीन व उपजीविका गमावून प्रकल्पग्रस्तांचा हा वैकुंठवास कोणत्या राजकीय संवेदनशीलतेचा परीचय आहे हा सामाजिक संशोधनाचा विषय असल्याचेही अग्रवाल यांचे म्हणणे आहे.