शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

आसिफच्या पोलीस कोठडीत वाढ

By admin | Updated: November 24, 2014 23:01 IST

येथील रूपेश मुळे नरबळी प्रकाणातील मुख्य आरोपी आसिफ शहा वल्द अजिम शहा उर्फ मुन्ना पठाण रा. वर्धा याची पोलीस कोठडी संपत असल्याने सोमवारी न्यायालयात हजर केले.

पाच जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी वर्धा : येथील रूपेश मुळे नरबळी प्रकाणातील मुख्य आरोपी आसिफ शहा वल्द अजिम शहा उर्फ मुन्ना पठाण रा. वर्धा याची पोलीस कोठडी संपत असल्याने सोमवारी न्यायालयात हजर केले. तपासाकरिता त्याची पोलीस कोठडी वाढविण्याची मागणी केल्याने ती तीन दिवस म्हणजेच २७ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. तर गुप्तधन शोधन्याकरिता आसिफच्या संपर्कात आलेल्या सहाही जणांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. रूपेशच्या नरबळी प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून आसिफला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याने रूपेशची हत्या करून त्याचे अवयव भाजून खाल्ल्याची कबुलीही पोलिसांना दिली होती. या प्रकरणात आणखी काही आरोपी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्याला तपासाकरिता २४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्याची कोठडी आज संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलिसांनी तपासाकरिता त्याची पोलीस कोठडी वाढविण्याची मागणी केली. यावर न्यायालयाने २७ नोव्हेंबर पर्यंत त्याच्या कोठडीत वाढ केली आहे. रूपेचा नरबळी देण्यापूर्ची गुप्तधन शोधण्याकरिता उत्तम महादेव पोहाणे (४३) रा. तळेगाव (टा.), अंकुश सुरेश गिरी (१८) रा. बोरगाव (मेघे), सुरेश रामराव धनोरी (४५) रा. वर्धा, दिलीप बाळकृष्ण भोगे (३७) रा. बोरगाव (मेघे) (मूळ सेलू तालुक्यातील हिंगणी येथील रहिवासी) व दिलीप उत्तम खाणकर (३४) रा. देवळी या पाच जणांनी आसिफशी संपर्क साधला होता. या प्रकरणाशी त्यांचा संबंध असल्याच्या संशयावरून त्यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. त्यांनाही न्यायालयाने २४ नोव्हेंबर पर्यंत पोलीस काठडी दिली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या पाच जणांनी देवळी येथे ज्या शेतात गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न केला होता ती शेती मक्त्याने करणाऱ्या सुरेश भोयर याला अटक केली होती. त्यालाही न्यायालयील कोठडी देण्यात आली होती.(प्रतिनिधी)