शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

आष्टीचे ग्रामीण रूग्णालय कागदोपत्री झाले सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 22:18 IST

शहरात दोन वर्षांपूर्वी बांधकाम पूर्ण झालेले ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्याचा अहवाल आरोग्य उपसंचालक नागपूर यांनी राज्य शासनाला पाठविला आहे. वास्तविक, सर्व कागदोपत्री दिसून येत आहे. यंत्रसामुग्री नाही, डॉक्टर नाही, औषध नाही, सर्व सुविधा नाहीच.

ठळक मुद्देयंत्रसामुग्री व डॉक्टरांचा पत्ताच नाही : कर्मचाºयांना बसण्यासाठी खुर्च्यांचाही अभावच

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (श.) : शहरात दोन वर्षांपूर्वी बांधकाम पूर्ण झालेले ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्याचा अहवाल आरोग्य उपसंचालक नागपूर यांनी राज्य शासनाला पाठविला आहे. वास्तविक, सर्व कागदोपत्री दिसून येत आहे. यंत्रसामुग्री नाही, डॉक्टर नाही, औषध नाही, सर्व सुविधा नाहीच. या नाहीच्या पाढ्याला होकारात बदलण्यात शासकीय अधिकाºयांनी बाजी मारल्याचेच दिसून येत आहे.सध्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीतून प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहे. याप्रकरणी आष्टीकरांनी वारंवार तक्रारी केल्या. तेव्हा विधानसभेत आ. अमर काळे यांनी आरोग्यमंत्र्यांना जाब विचारला. यावर सहा महिन्यांत ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले. नुकतेच हिवाळी अधिवेशन पार पडले. यानंतर ग्रामीण रुग्णालयाच्या आस्थापनेकरिता २ डॉक्टर, ६ नर्स, १ ब्रदर अशी ९ कर्मचारी आष्टीला पाठविण्यात आले आहेत. त्यांना बसायला फर्निचर नाही. तपासणीची यंत्रसामुग्री नाही. आलेले डॉक्टरही वर्धेला सेवा देत आहेत. अशा स्थितीत येथील ग्रामीण रुग्णालय कागदोपत्री सुरू झाल्याची ओरड ग्रामस्थ करीत आहे.योग्य उपचार मिळत नसल्याने रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. मानवी दृष्टीकोन ठेवून आरोग्यमंत्र्यांनी ग्रामीण रुग्णालय सुरू करावे, जनतेच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये, असा इशारा अंतोरा येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश ठाकरे, डॉ. नरेंद्र देशमुख, गजानन आंबेकर, दिनेश मानकर यांनी दिला आहे.मागील वर्षी उपचारांअभावी १५ रुग्णांचे गेले प्राणमागील वर्षी १५ जणांचा विविध कारणांमुळे उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. आष्टी शहरापासून वर्धा ८५ किमी, नागपूर ११५ किमी तर अमरावती ७२ किमी आहे. या ठिकाणी उपचारासाठी जाताना विलंब होतो. रुग्ण वेळेवर पोहोचू शकत नसल्याने त्यांची प्राणांशी गाठ असते. शिवाय रुग्णवाहिकेची सुविधा नाही. यामुळे रुग्णांचा बळी जात असल्याचे वास्तव आहे.आष्टी येथील ग्रमीण रुग्णालय १ डिसेंबर २०१७ पासून सुरू झाले आहे. कर्मचारी व डॉक्टर दिले आहे. औषध, यंत्रसामुग्री व बेडची व्यव्स्था लवकरच देण्यात येईल. शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहे.- डॉ. पुरूषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.