शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

आष्टीच्या तलाठी कार्यालयाला लागली गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 23:58 IST

अनेक वर्षांपासून या इमारतीची डागडुजी झालेली नसून येथे अद्ययावत तलाठी कार्यालय बांधून देण्याची मागणी कित्येक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात टाकून कामकाज करावे लागत असल्याचे तलाठी सांगतात.

ठळक मुद्देकाम करताना अडचणी : दस्तऐवज होताहेत खराब; कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : येथील तहसील कार्यालयाच्या शेजारी असलेल्या तलाठी कार्यालयाचे गेल्या दोन वर्षापासून खस्ताहाल आहे. छताचे प्लॅस्टर निघाले असून फ्लोरिंगही उखडलेले आहे. त्यामुळे पावसात या इमारतीच्या छताला धारा लागत असल्याने कामकाज करताना तलाठ्यांची मोठी पंचाईत होत आहे. या दुरवस्थेमुळे छत अंगावर पडण्याचीही भीती निर्माण झाली असून जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे.येथील तलाठी कार्यालयामध्ये सामान्य नागरिक दररोज सातबारा, आठ अ, नकाशा, चतुर सीमा, फेरफार पंजी यासह जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले मिळविण्याकरिता या कार्यालयात येतात.पण, या कार्यालयात कर्मचारी आणि दस्तऐवज ठेवण्यासाठी अडचणीचे जात असल्याने आलेल्यांनाही उभे राहण्यासाठी जागा नाही. अशावेळी सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांची व शेतकऱ्यांची मुस्कटदाबी होत आहे. आष्टी हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी शासनाने अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे, मात्र असे होताना दिसत नाही. परिणामी गळणाºया पाण्यामुळे कार्यालयातील महत्त्वाचे दस्तऐवजही ओले होत असल्याने धोक्यात आले आहे. त्यामुळे हे कार्यालय आता कार्यरत कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्यांसाठीही असुरक्षित झाल्याची ओरड होत आहे.तलाठी कार्यालयाची इमारत बळकावलीअनेक वर्षांपासून या इमारतीची डागडुजी झालेली नसून येथे अद्ययावत तलाठी कार्यालय बांधून देण्याची मागणी कित्येक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात टाकून कामकाज करावे लागत असल्याचे तलाठी सांगतात. आष्टी तहसील कार्यालयाच्या परिसरांमध्ये तलाठी कार्यालय बांधकाम झाल्यावर याठिकाणी दुय्यम निबंधकांनी मुद्रांक विक्रेत्यांचे कार्यालय हलविले आणि तलाठी कार्यालयाला पर्यायी जागा दिली. ही पर्यायी जागा वाहन ठेवण्याच्या बाजूलाच असल्यामुळे या ठिकाणी कुठल्याही क्षणी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.