शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
4
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
5
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
6
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
7
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
8
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
9
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
10
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
11
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
12
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
13
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
14
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
15
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
16
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
17
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
18
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
19
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
20
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?

आर्वी मार्ग उठलाय नागरिकांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 21:40 IST

शहरातून आर्वीकडे जाणारा अत्यंत वर्दळीचा मार्ग वाहनचालक, पादचाऱ्यांकरिता जीवघेणा ठरत आहे. मात्र, संबंधितांना सोयरसुतक नाही, रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी वाहनचालक, नागरिकांतून होत आहे.

ठळक मुद्देभुयारी गटाराचे खड्डे कायमच । अपघाताची शक्यता बळावली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातून आर्वीकडे जाणारा अत्यंत वर्दळीचा मार्ग वाहनचालक, पादचाऱ्यांकरिता जीवघेणा ठरत आहे. मात्र, संबंधितांना सोयरसुतक नाही, रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी वाहनचालक, नागरिकांतून होत आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुनापाणी चौकापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकामाला मंजुरी मिळाली. या रस्त्यावर तब्बल ३५ कोटी रुपये खर्ची घातले जात आहे. मात्र, रस्ता बांधकाम नियोजनाच्या अभावातच पूर्णत्वास जात आहे. रस्त्याचे बांधकाम करण्यापूर्वी भुयारी गटार योजनेकरिता खड्डे तयार करण्यात आले. यानंतर सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. छत्रपती शिवाजी चौक ते आर्वी नाका चौकापर्यंत सिमेंट रस्त्याचे एका बाजूने बांधकाम पूर्णत्वास गेले आहे. मात्र, भुयारी गटार योजनेचे खड्डेच बुजविण्यात आले नाही. हे खड्डे रात्रीच्या सुमारास वाहनचालकांच्या दृष्टीस पडत नसल्याने या मार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. खड्डयाजवळ गेल्यानंतर वाहनचालकांना एकाएकी दिसत असल्याने ते ब्रेक लावतात. यात अपघात होत आहेत. या मार्गावरून जाताना वाहनचालकांना सर्कसच करावी लागत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित कंत्राटदाराने फलक लावण्याची गरज असताना तेही लावण्यात आले नाही. आर्वी नाका चौक परिसरात शिकवणी वर्ग असल्याने सायंकाळी रस्ता गर्दीने फुललेला असतो. खड्डयांमुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. मोठा अपघात होण्यापूर्वी खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.पानटपरीचालकांचे अतिक्रमणआर्वी नाका परिसतरात अनेक व्यावसायिकांकडून रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. पानठेलेचालक ठेल्यातील साहित्य रस्त्यावर थाटतात. पानटपरीवर येणारे ग्राहक रस्त्यावरच आपली वाहने बेशिस्तपणे उभी करतात. येथे वाहतूक पोलीस तैनात असतात. त्यांचेही या प्रकाराकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यामुळेही अपघाताचा धोका आहे