शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आर्वीत भाजपला, तर सेलूत काँग्रेसच्या प्रचाराला लागले डबल इंजिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:14 IST

वर्धा लोकसभा मतदारसंघ प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर आता प्रचाराचा वेग वाढत आहे. आर्वी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या प्रचाराची धुरा माजी आमदार दादाराव केचे यांच्यासह केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे सल्लागार सुधीर दिवे हेही सांभाळत आहे. याठिकाणी भाजपचे दोन नेते प्रचाराची धुरा सांभाळत असल्याने यावेळी येथे भाजपला मताधिक्याची मोठी आशा आहे. सेलू येथे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराला दोघांची जोड मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघ प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर आता प्रचाराचा वेग वाढत आहे. आर्वी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या प्रचाराची धुरा माजी आमदार दादाराव केचे यांच्यासह केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे सल्लागार सुधीर दिवे हेही सांभाळत आहे. याठिकाणी भाजपचे दोन नेते प्रचाराची धुरा सांभाळत असल्याने यावेळी येथे भाजपला मताधिक्याची मोठी आशा आहे. सेलू येथे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराला दोघांची जोड मिळाली आहे.काँग्रेसचे नेते दिवंगत प्रमोद शेंडे यांचे सुपुत्र शेखर शेंडे व वर्धा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय उर्फ पप्पू जयस्वाल हे कॉँग्रेस उमेदवार यांच्या प्रचारार्थ काम सांभाळत आहे. या भागावर पूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद शेंडे यांची एक हाती पकड होती. परंतु, त्यानंतरच्या काळात माजी राज्यमंत्री रणजित कांबळे यांनी या भागातील शेडेंच्या वर्चस्वाला सुरूंग लावण्याचे काम केले. सोबतच सहकार क्षेत्रावर वर्चस्व ठेवणाऱ्या माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांच्याही कृषी उत्पन्न बाजार समितीत त्यांच्याच नेतृत्वाला शह देण्याचे काम केले. त्यामुळे जयस्वाल यांच्याकडे कॉँग्रेसची जबाबदारी आली. आता कॉँग्रेस उमेदवाराला जयस्वाल व शेंडे या दोघांचाही आधार घ्यावा लागत आहे.हिंगणघाट मतदार संघात समाविष्ट असलेल्या भागात जयस्वाल यांना प्रचारासाठी कॉँग्रेस उमेदवार सोबत घेवून गेले तर काही भागात शेखर शेंडे सोबत होते, अशी चर्चा आहे. आर्वी विधानसभा मतदारसंघात गेल्या वेळी लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचा पराभव झाला.आता या मतदारसंघात सुधीर दिवे व दादाराव केचे दोघेही भाजपच्या प्रचारासाठी जोरदार लागले आहे. याचा फायदा लोकसभा उमेदवाराला किती होतो, हे पाहणे महत्वाचे राहिल. काँग्रेसचे आमदार अमर काळे यांच्या विषयी असलेली ‘अ‍ॅन्टी इन कंबन्सी’ याचाही फायदा भाजपला होईल शिवाय बसपाचे उमेदवार शैलेश अग्रवाल हे या भागातून कॉँग्रेसच्या किती मताना कात्री लावतात हेही महत्त्वाचे ठरेल. त्यामुळे आर्वी हा गड राखून ठेवण्यासाठी आ. अमर काळेंसह त्यांच्या समर्थकांना प्रचारात मेहनत करावी लागणार आहे.