शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
3
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
4
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
5
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
6
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
7
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
8
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
9
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
10
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
11
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
12
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
13
"म्हाताऱ्याला वेड लागलंय", चाहत्याची कमेंट पाहून भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले- "तुम्हाला..."
14
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
15
Health Tips: एक लवंग दूर करेल दाताचे, तोंडाचे, पोटाचे विकार; पण जाणून घ्या 'अचूक' वेळ!
16
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
17
धक्कादायक! विठ्ठल दर्शनाचा बोगस टोकन पास घेऊन पंढरपूर मंदिरात ७ जणांचा घुसण्याचा प्रयत्न
18
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
19
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?

आर्वीत जलदिनी पाण्यासाठी आंदोलन

By admin | Updated: March 23, 2017 00:42 IST

भुयारी गटाराचे काम करताना जेसीबीमुळे पाणी पुरवठ्याची पाईपलाईन फुटली. परिणामी, पाणी पुरवठा बंद झाला.

युवा स्वाभिमानचा दोन तास पालिकेत ठिय्या आर्वी : भुयारी गटाराचे काम करताना जेसीबीमुळे पाणी पुरवठ्याची पाईपलाईन फुटली. परिणामी, पाणी पुरवठा बंद झाला. याविरूद्ध युवा स्वाभिमान व विठ्ठल वॉर्डातील नागरिकांनी सदर काम बंद पाडत मोर्चा काढला. पालिकेत दोन तास ठिय्या दिल्यानंतर झालेल्या चर्चेवरून आंदोलन मागे घेतले; पण पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला. विठ्ठल वॉर्ड येथे भुयारी गटार योजनेचे काम सुरू होते. यात जेसीबीने खोदकाम करीत असताना पाणी पुरवठ्याची पाईपलाईन अनेक ठिकाणी पुुटली. नागरिकांनी विरोध केला असता दुरूस्तीचे काम आमचे नसून जीवन प्राधिकरणचे आहे, असे सांगितले. यावरून युवा स्वाभिमानचे दिलीप पोटफोडे, प्रमिला हत्तीमारे, शुभांगी कलोडे व नागरिकांनी कनिष्ठ अभियंता साकेत राऊत यांना बोलविले. त्यांनी तात्पुरते काम होऊ द्या, नंतर पाहू, असे उत्तर दिले. यावर पिण्याच्या पाण्याची समस्या पूर्णत: मार्गी लागत नाही, तोपर्यंत काम होऊ देणार नाही, अशी भूमिका युवा स्वाभिमान व नागरिकांनी घेतली. शिवाय मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधत काम थांबविले. यानंतर मोर्चा काढत युवा स्वाभिमानचे पदाधिकारी व नागरिक पालिकेवर धडकले. पाणी पुरवठ्याचा प्रश्न निकाली निघेपर्यंत कोणतेही काम होणार नाही, अशी भूमिका घेतली. शिवाय भूयारी गटारचे काम झाल्यास पाईपलाईन खाली दबेल. नळ जोडणी घेणाऱ्या नागरिकांना ड्रेनेज फोडावे लागेल. जोडणी असलेल्यांचा पाईप फुटला तर नेमका लिकेज कुठे आहे, हे कळणार नाही. जागोजागी ड्रेनेज फोडावी लागेल. नियोजनशून्य कामांमुळे पुन्हा तोडफोड करावी लागणार असल्याने खर्च व्यर्थ ठरेल. उन्हाळ्याची सुरूवात झाली असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागेल, या बाबी नगर परिषदेच्या लक्षात आणून दिल्या.