शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीच्या समस्येने आर्वीकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:00 IST

छत्रपती शिवाजी चौकापासून गांधी चौकाकडे जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला चौकातच रिक्षा उभ्या असतात, तर  वाहनतळाअभावी दुकानासमोर बेशिस्तपणे वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली आहे. शिवाजी चौकाकडून देऊरवाडाकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. अप्पर वर्धा कॉलनी ते मॉडेल हायस्कूलपर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहने असंतुलित होत अपघात होतात.

ठळक मुद्देअतिक्रमणाचा विळखा : पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : दुचाकी-चारचाकी वाहनांची वाढती संख्या, अतिक्रमण, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, वाहनचालकांचा निष्काळजीपणा, वाहनतळाचा अभाव आदी कारणांमुळे शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस उग्र होत आहे. अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.छत्रपती शिवाजी चौकापासून गांधी चौकाकडे जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला चौकातच रिक्षा उभ्या असतात, तर  वाहनतळाअभावी दुकानासमोर बेशिस्तपणे वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली आहे. शिवाजी चौकाकडून देऊरवाडाकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. अप्पर वर्धा कॉलनी ते मॉडेल हायस्कूलपर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहने असंतुलित होत अपघात होतात. वाहन चालवताना अनेक अडथळे पार करीत  वाहनधारकांना अमरावतीकडे कसेबसे जावे लागत आहे. शहरातील अनेक ठिकाणे अपघातप्रवण  स्थळ झाले आहे. बस स्थानक तसेच इलायची कार्यालयासमोर ऑटोरिक्षा, काळी-पिवळी व ट्रक रस्त्याच्या कडेला उभे केले जात असल्याने वाहनचालकाला मुख्य रस्त्यावरून येणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे नेहमी अपघात होतात. पोलीस विभाग, नगरपालिका प्रशासनाने उपाययोजना कराव्या, अशी नागरिकांची मागणी  आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी