शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आर्वीकरांनी अनुभवला ‘वेदनेचा हुंकार’

By admin | Updated: May 8, 2016 02:36 IST

वेदनेचा हुंकार अन स्वराचा झंकार! हा डॉ. विकास आमटे यांच्या संकल्पनेतून साकारलेला आर्केष्ट्रा स्वरानंदनवन रसिकमनाला स्पर्श करून गेला.

आर्वी : वेदनेचा हुंकार अन स्वराचा झंकार! हा डॉ. विकास आमटे यांच्या संकल्पनेतून साकारलेला आर्केष्ट्रा स्वरानंदनवन रसिकमनाला स्पर्श करून गेला. आपल्या अपंगत्वावर मात करून जगण्याची उमेद व जिद्ध कायम असलेल्या या बहुविकलांग कलाकारांनी सादर केलेल्या गीत-संगीत व नृत्याविष्काराद्वारे आपल्यातील बहुमुखी प्रतिभेचा परिचय देत उपस्थित रसिक श्रोत्यांच्या थेट काळजालाच हात घालुन उपस्थित आर्वीकरांची वाहवा मिळवली.वैभवशाली सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या आर्वी शहराच्या इतिहासात प्रथमच दोन हजार चौरस फुटाच्या भव्य रंगमचावरून महामानव बाबा आमटे यांनी उभारलेल्या आनंदवनातील अंध-अपंग-बहुविकलांग कलाकरांनी भारतरत्न राजीव गांधी स्टेडियमवर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आर्वीकरासमोर प्रस्तुत केलेल्या आर्केष्ट्रा ‘स्वरानंदनवन’ अर्थात संगीत रजनीला रसिक श्रोत्यांनी डत्स्फूर्त दाद देवून मानवता व रसिकतेचा परिचय करून दिला.आर्वी लायन्स कल्बने आनंदवनातील कुष्ठरोगी, अंध-अपंग, अनाथ, आदिवासी बहुविकलांगांच्या साह्यार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ. अमर काळे, नगराध्यक्ष दुर्गेश पुरोहित, पूर्तीचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर दिवे, वर्धा नागरी बँकेचे अध्यक्ष अनिल जोशी, लायन्सचे प्रांतपाल राजे मुधोजी भोसले (नागपूर), उपप्रांतपाल सुनील व्होरा, कॅबीनेट सेक्रेटरी विवेक वैद्य, न.प. बांधकाम सभापती संजय थोरात, विजय बाजपेयी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक लायन्सचे संस्थापक अध्यक्ष तथा झोन चेअरपर्सन डॉ. रिपल राणे आणि प्रा. मोरेश्वर देशमुख यांनी केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गणेश व रंगमंच पूजन झाले. याप्रसंगी स्वत:च्या अपंगत्वावर मात करून ‘स्वरानंदनवन’ यशो शिखरावर नेणारे व्यवस्थापक सदाशिव ताजने यांचा शाल श्रीफळ देवून गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर्वी लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. कालिंदी राणे, उपाध्यक्ष डॉ. दीपक चव्हाण, सचिव डॉ. प्रकाश राठी, कोषाध्यक्ष दीपक कटियारी, वैभव फटींग, महेश लाडके, लक्ष्मीकांत साखरे, ढबाले, शुभम देशमुख, लखन अग्रवाल, आशिष अग्रवाल, दीपक राठी, अ‍ॅड. जाणे, नितीन वानखेडे, संदीप राऊत, मनीषा ढोके, मंजुषा देशमुख, ढबाले, सुनीता अग्रवाल, सुनीता राठी, सुनिता कटियारी, ज्योती लाडके, आरती देशमुख, रेखा राऊत, वर्षा वानखडे यांनी सहकार्य केले. आर्वीकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.(तालुका प्रतिनिधी)