शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

आर्वी आगाराच्या बसगाड्या रिमोल्ड टायरवरच

By admin | Updated: August 3, 2016 01:04 IST

सातत्याने मागणी करूनही गत १५ दिवसांपासून विभागीय कार्यालयातून आर्वी आगाराला नवीन टायर प्राप्त झाले नाही.

१५ दिवसांपासून टायरचा पुरवठा नाही : गाड्या रस्त्यात कुठेही पडतात बंद आर्वी : सातत्याने मागणी करूनही गत १५ दिवसांपासून विभागीय कार्यालयातून आर्वी आगाराला नवीन टायर प्राप्त झाले नाही. यामुळे येथील बसगाड्या रिमोल्ड टायरवरच धावत आहेत. परिणामी या नवीन संकटाने चालक व वाहकही त्रस्त झाले आहेत. या बसेच रस्त्यात कुठेही बंद पडत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी प्रवाशांच्या जिविताशीच परिवहन विभागाचा सध्या खेळ सुरू आहे. आर्वी उपविभागाचे ठिकाण आहे. येथील परिवहन विभागाकडून करण्यात येत असलेल्या मागणीनुसार नेहमीच कमी टायर मिळाले आहे. परिवहन महामंडळाच्या गाड्यांचे वर्षातून दोन वेळी टायर बदलविणे अपेक्षित आहे. येथे एक वर्षाच्यावर काळ होऊनही टायर मिळाले नाही. गाड्यांच्या टायरचे आयुष्य संपुनही त्यावरच गाड्या धावत आहे. परिणामी यात वेळेवर गाड्यांचे शेड्युल रद्द होते. चालक-वाहक या रोजच्या टायर अभावी बंद पडणाऱ्या गाड्याने त्रस्त झाले आहेत. आर्वी बसस्थानक प्रमुखाने विभागीय कार्यालयाला टायर पुरवठ्याची तातडीने मागणी करूनही अद्याप पुरवठा केला नसल्याने चालक वाहकासमोर नव्या समस्या निर्माण होत आहे. सध्या आर्वी परिवहन विभागाच्या सर्व गाड्या रिमोल्ड टायरवर धावत असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. यात एका गावाला जाणाऱ्या पाच ते सहा शेड्युल नियमित जात असेल तर ते अर्ध्यावर आल्याने प्रवाशांची बसअभावी ताटकळत होत आहे. यावर तातडीने उपाय काढून परिवहन मंडळाने प्रवाशांच्या जीवितांशी सुरू असलेला खेळ तातडीने थांबविण्याची मागणी होत आहे. सध्या टायर अभावी भंगार अवस्थेत गाड्या परिवहन विभागात उभ्या असून याचा फटका परिवहन महामंडळाला बसत असल्याची ओरड होत आहे.(तालुका प्रतिनिधी)