शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

आर्वीत भाजप, आंजीमध्ये सत्ताधारी तर तळेगावात विरोधक विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 23:36 IST

रिक्त पदांसाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. यात आर्वी तालुक्यात भाजपाने वर्चस्व कायम ठेवले तर तळेगावात विरोधकाने बाजी मारली.

ठळक मुद्देग्रामपंचायतींची पोटनिवडणूक : आर्वीत माजी सभापतीचा पराभव

ऑनलाईन लोकमतवर्धा : रिक्त पदांसाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. यात आर्वी तालुक्यात भाजपाने वर्चस्व कायम ठेवले तर तळेगावात विरोधकाने बाजी मारली. आंजी (मोठी) येथे सत्ताधारी गटाच्या उमेदवारानेच विजय मिळविले. जिल्ह्यात अन्य ठिकाणीही भाजप व सत्ताधारी गटांनीच जागा जिंकल्या आहेत.आर्वी : तालुक्यातील बोथली नटाळा व भादोड ग्रा.पं. पोट निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळविले. नटाळा येथे सरपंच पदासाठी काँगे्रसच्या नेत्या तथा माजी जि.प. सभापती रजनी नानाजी देशमुख यांचा भाजप प्रणित उमेदवार शिला रामदास राऊत यांनी केवळ १६ मतांनी पराभव करीत इतिहास घडविला. या निकालामुळे तालुक्यात कमालीची चर्चा रंगली आहे.तालुक्यातील नटाळा या ग्रा.पं. च्या निकालात भाजप प्रणित शिला राऊत सरपंच पदासाठी तर मिरा प्रमोद कंगाले या दोन वॉर्डातून विजयी झाल्या. सुभाष नारायण पडगीलवार निवडून आले आहेत. भादोड ग्रा.पं. निवडणुकीत खुशाल कवडू मसराम, लता गजानन माणिकपुरे, नितीन धनराज राऊत, इंदिरा ना. आत्राम, सुनीता भीमराव नेवारे हे निवडून आले आहेत.निकाल जाहीर होताच भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. माजी आमदार दादाराव केचे यांच्या आर्वी विधानसभा क्षेत्रातील सर्वांगीण विकास कामांमुळे स्थानिकांनी भाजपप्रणित उमेदवारांना पसंती दिली, असे दिसते. निवडून आलेल्या उमेदवारांसाठी माजी आमदार दादाराव केचे यांच्यासह पं.स. सभापती शिला पवार, धर्मेंद्र राऊत, राजू पवार, सचिंद्र उर्फ राजू कदम, जयंत नेपटे, रोशन पवार आदींनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.