शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

अन्न-पाण्याच्या शोधात फिरणाऱ्या पक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:52 IST

कोल्हीच्या जंगलातील पाणवठे पूर्णपणे आटल्याने या पक्ष्यांचे प्रजनन धोक्यात आले आहे. जंगलात भ्रमंतीसाठी जात असलेल्या पक्षिमित्रांना या ठिकाणी पॅराडाईज व इतर पक्ष्यांचा अधिवास असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देकोल्हीच्या जंगलात पक्षीप्रेमी, वनविभागाचा उपक्रम : पाणवठ्यांची वाढविणार संख्या

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : कोल्हीच्या जंगलातील पाणवठे पूर्णपणे आटल्याने या पक्ष्यांचे प्रजनन धोक्यात आले आहे. जंगलात भ्रमंतीसाठी जात असलेल्या पक्षिमित्रांना या ठिकाणी पॅराडाईज व इतर पक्ष्यांचा अधिवास असल्याचे दिसून आले.पक्षीमित्र प्रवीण कडू यांनी या जंगलात कृत्रिम पाणवठे तयार करण्याची संकल्पना मांडली. ही सूचना वनपरिक्षेत्राधिकारी बनसोड यांना केली तेव्हा तेही मदतीसाठी तयार झाले. प्रवीण कडू, आशिष भोयर, प्रदीप गिरडे आणि वनविभागाचे दोन कर्मचारी मिळून तीन ठिकाणी छोटे-छोटे पाणवठे तयार केले असून त्यात निरंतर पाणीही टाकले जात आहे.उन्हाची तीव्रता झपाट्याने वाढत आहे. जेथे मनुष्याला झळा असह्य होतात, तेथे या चिमुकल्या जिवांची अवस्था किती बिकट असेल, हे वेगळं सांगायला नको. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक प्रजातीचे पक्षी उष्मतामानामुळे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडत आहे.या तीव्र ऊन्हामुळे जंगलात पक्षांसाठी असलेले नैसर्गिक पाणवठेही पूर्णत: आटले आहेत. त्यातच पॅराडाईज फ्लाय कॅचर (स्वर्गीय नर्तक), इंडियन पिट्टा (नवरंग), पिकेल्स ब्ल्यू (टिकेलचा माशीमार), ओलिएन्टल व्हाईट आय तसेच रॉकेट टाईल ड्रॅन्गो या पक्षांचा अधिवास हिंगणघाट शहरालगतच्या कोल्हीच्या जंगलात अधिक आहे. समुद्र किरणाºयावरील मॅन्ग्रो फॉरेस्ट (खाजन वन) वरून उन्हाळी पाहुणे पक्षी म्हणून हे पक्षी आपल्या भागात येतात.घरटी बनवत अंडे देऊन आपल्या पिलांना परत घेऊन जातात. या पाणवठ्यावर विविध प्रकारच्या माशा आणि इतर कीटक येतात. जे या पक्ष्यांचे खाद्य आहे. पाणवठे तयार करण्यात आल्यामुळे पक्ष्यांच्या तृष्णा-तृप्तीची सोय झाली आहे. पक्षिप्रेमी आणि वनविभागाच्या या उपक्रमाचे तालुक्यात कौतुक केले जात आहे.पहिल्याच दिवशी मोराच्या कळपाने भागवली तहान२८ एप्रिलला कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले. त्याच दिवशी दुपारी वनकर्मचारी या पाणवठ्यात पाणी टाकण्यासाठी जात असताना ६ मोरांचा कळप पाणी पित असताना आढळल्याचे वनविभागाच्या कर्मचाºयाने सांगितले. त्यामुळे अशा पाणवठ्याची अत्यंत गरज असल्याचे यावरून दिसून आले. आगामी काळात वनविभागाच्या सहकार्याने या कृत्रिम पाणवठ्यांमध्ये आणखी वाढ करण्याचे पर्यावरण प्रेमींनी ठरविले आहे.