शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा नदी जलाशयावर होणार विदेशी पाहुण्यांचे आगमन

By admin | Updated: December 2, 2015 02:13 IST

ऋतू बदलाचे संकेत मानवापेक्षाही पशुपक्ष्यांना आधी लागतात. बदलत्या वातावरणानुसार पक्षी स्थालांतर करतात.

काही पक्ष्यांनी जमविले बस्तान : पक्षी अभ्यासक व पर्यटकांना पर्वणीप्रभाकर शहाकार पुलगावऋतू बदलाचे संकेत मानवापेक्षाही पशुपक्ष्यांना आधी लागतात. बदलत्या वातावरणानुसार पक्षी स्थालांतर करतात. स्थलांतराच्या काळात गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी उष्ण कटीबंधाच्या देश-विदेशातील विविध प्रजातीच्या पक्ष्यांचे येथील वर्धा नदीच्या जलाशयावर आगमन होत असते. यंदाही विविध प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद घेण्याची संधी पक्षी अभ्यासकांना मिळणार आहे. पावसाच्या कमी प्रमाणामुळे यंदा नदीच्या जलाशयात पाणी नाही. यामुळे विदेशी पाहुण्यांचे आगमन लांबले असून डिसेंबरच्या मध्यात ही पाहुणेमंडळी येणार असल्याचे दिसते. चीन, जपान, मलेशिया, साऊथ कोरिया, नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश आदी देशातून स्थलांतर करून विदेशी पक्षी आॅक्टोबरच्या प्रारंभी येऊन मार्च अखेरपर्यंत नदीकाठावर वास्तव्य करतात. यांच्यापैकी लांब चोचीचा काळा करकोचा, पिनटेल डक, गळ्यावर लालपट्टा असणारा खंड्या, पांढरा शुभ्र बगळा, बदलक या पक्ष्यांनी नदीच्या डोहाच्या जलाशयाजवळ आपले बस्तान आॅक्टोबरमध्येच जमविले आहे.विदेशातून वर्धा नदीच्या जलाशयावर वा डोहाच्या काठावर येणारे विविध प्रजातीचे पक्षी देश-विदेशातून हिवाळ्यातील गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी चिल्या-पिल्यासह येतात. त्यांचा ४-५ महिने मुक्काम असतो. हे विदेशातील पक्षी नदीकाठावर मिळेत त्या ठिकाणी घरटी उभारतात. दिवसभर ते आकाशात फिरत असले तरी रात्री घरट्यात जातात; पण पहाट प्रहारापासून सूर्योदयापर्यंत हे विदेशी पाहुणे डोहाच्या जलशयात विहार करताना दिसतात. पहाट प्रहरापासून सकाळपर्यंत समूहाने हे पक्षी जलाशयाच्या पाणवट्यावर गर्दी करतात. पहाटेची भटकंती करणाऱ्या मंडळींनी हे दृश्य अनकदा डोळ्यात साठविले आहे. सध्या मोर, लांडोर, ससाणा, चायनिज डक, बगळा, करकोचा या पक्ष्यांचा दररोज सकाळी जलायशावर विहार आहे. त्यांनाही आपल्या विदेशी मित्रांच्या आगमनाची प्रतीक्षा लागली आहे. पक्षीमित्र, पर्यटकांसाठी या विदेशी पाहुण्यांचे आगमन म्हणजे गुलाबी थंडीची पर्वणीच ठरत असते.