शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

महिलेचा ओढणीने गळा आवळून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 23:33 IST

येथील पिपरी (मेघे) परिसरातील पिपल्स फॉर अ‍ॅनिमलच्या करूणाश्रमालगत असलेल्या टेकडी परिसरात बुधवारी सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता तिचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले.

ठळक मुद्देपिपरी (मेघे) परिसरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील पिपरी (मेघे) परिसरातील पिपल्स फॉर अ‍ॅनिमलच्या करूणाश्रमालगत असलेल्या टेकडी परिसरात बुधवारी सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता तिचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले. वेळीच तपासचक्र फिरल्याने तिची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. सदर महिलेचे नाव संध्या महादेव पाटील (५१) रा. गजानन नगर असे असल्याचे समोर आले असून हत्येचे कारण आणि आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.आज सकाळी पिपरी (मेघे) परिसरात असलेल्या टेकडीच्या परिसरात एका महिलेचा मृतदेह पडून असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. या माहितीवरून ठाणेदार विजय मगर आणि त्यांची चमू घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. प्रारंभी यश येत नसलेल्या या प्रकरणात त्यांना मृतदेहाची ओळख पटविण्यात यश आले. घटनास्थळी पंचनामा करतानाच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रासायनिक तपासणी करणाऱ्या चमूला पाचारण करण्यात आले. घटनास्थळी पंचनामा करून सदर महिलेचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. येथून तिचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता सेवाग्राम रुग्णालयात नेण्यात आला.संध्या पाटील ही आर्वी मार्गावर असलेल्या एका गॅस एजंसीत कार्यरत असल्याचे समोर आले. तिचा विवाह संजय तेलंग नामक व्यक्तीशी झाला होता. मात्र तिचा घटस्फोट झाल्याने ती पतीपासून विभक्त झाली होती. ती गजानन नगर येथे संध्या पाटील नावाने एकटीच राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. रामनगर पोलिसांचे हात आरोपींच्या मानेपर्यंत असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.घटनास्थळी ठाणेदार विजय मगर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक यादव, सुरज तेलगोटे, शिपाई आकाश चुंगडे यांच्यासह पिपरीचे सरंपच अजय गौळकार, उपसरपंच शेषराव मुंगले यांच्यासह परिसरात नागरिक जमा झाले होते. यातील एका इसमाकडूनच महिलेची ओळख पटली.हत्येचे कारण गुलदस्त्यातसंध्या पाटील हिचा गळा आवळून खून झाल्याचे समोर आले आहे. मात्र तिची हत्या कोणत्या कारणातून झाली याचा खुलासा झाला नाही. या प्रकरणात एकापेक्षा अधिक आरोपी असल्याचा संशय पोलिसांचा आहे. सध्या या प्रकरणात कुठलाही सुगावा पोलिसांना लागला नसून हत्येचे कारण गुलदस्त्यात आहे. असे असले तरी सदर प्रकरण अनैतिक संबंधातून घडल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.आधार केंद्र चालकांकडून असहकार्यसदर महिलेची ओळख पटविण्याकरिता या भागातील आधार केंद्र चालकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. मात्र त्यांच्याकडून पोलिसांना कुठलेही सहकार्य मिळाले नाही. यामुळे शासनाची ही प्रणाली वेळेवर कुचकामी ठरणारीच असल्याचे नागरिक बोलत होते.स्थानिक महिलेच्या उपस्थितीत पंचनामापंचनामा करण्याकरिता घटनास्थळी महिला उपस्थित नसल्याने या परिसरातून एका महिलेला पाचारण करण्यात आले होते. या महिलेच्या उपस्थितीत येथे पंचनामा करण्यात आला.

टॅग्स :Murderखून