शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आर्वीत साकारणार नाट्यगृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:05 IST

स्थानिक नगरपालिके अंतर्गत विविध विकास कामे झपाट्याने सुरू आहे. या विकास कामांच्या प्रगतीचा आलेख वाढत असताना त्यात आता पुन्हा नाट्यगृहाची भर पडली आहे. ४ कोटी रुपयातून येथे सुसज्ज नाट्यगृह साकारण्याचा मार्ग मोकळा झाला असून पालिकेकडे निधीही वळता करण्यात आला आहे.

ठळक मुद्देविकासात भर : पालिकेला मिळाला ४ कोटींचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : स्थानिक नगरपालिके अंतर्गत विविध विकास कामे झपाट्याने सुरू आहे. या विकास कामांच्या प्रगतीचा आलेख वाढत असताना त्यात आता पुन्हा नाट्यगृहाची भर पडली आहे. ४ कोटी रुपयातून येथे सुसज्ज नाट्यगृह साकारण्याचा मार्ग मोकळा झाला असून पालिकेकडे निधीही वळता करण्यात आला आहे.शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता नगर पालिकेच्यावतीने शहरात विकास कामांचा सपाटा सुरु केला आहे. समाजातील प्रत्येक घटकांचा विकास व्हावा यासाठी भर दिली जात आहे. शहरात नेहमी विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांकरिता सुसज्ज असे नाट्यगृह असावे. जेणे करुन शहरासह तालुक्यातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळून त्यांच्या कला वृध्दींगत व्हाव्या. तसेच अनेकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना चालना मिळावी, याकरिता माजी आमदार दादाराव केचे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी नगर पालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, उपाध्यक्ष उषा सोनटक्के, गटनेता प्रशांत ठाकूर, सभापती व नगरसेवक यांची बैठक बोलावून नाट्यगृहाच्या निमिर्तीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या. नगर पालिका प्रशासनाने तात्काळ नाट्यगृहाच्या निर्मितीबाबतचा प्रस्ताव तयार करुन त्याबाबत पालिकेच्या सभागृहात मंजूरी घेण्यात आली. सभागृहाच्या मंजूरीनंतर तो प्रस्ताव माजी आमदार दादाराव केचे यांच्याकडे सोपविला.माजी आमदार केचे यांनी हा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे सादर केला होता. त्यानंतर त्यांनी सतत त्याचा पाठपुराव केला. त्याचे फलीत म्हणून महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने राज्यातील नगर पालिकेंना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी देण्यात येणाऱ्या विशेष अनुदानातून आर्वी नगरपालिकेकरीता ४ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. हा निधी नगर पालिकेच्या खात्यात वळता करण्यात आल्याने आता लवकर या नाट्यगृहाच्या कामाला सुरुवात होणार आहे. आर्वीकरांसाठी हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माजी आमदार दादाराव केचे यांनी प्रत्यक्ष भेटून आभार मानले.ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शहराच्या विकासाकरिता वेळोवेळी सहकार्य मिळत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विशेष कार्य अधिकारी सुमित वानखेडे यांचे नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे उपाध्यक्षा उषा सोनटक्के, गटनेते प्रशांत ठाकूर यांच्यासह पालिकेचे सभापती, नगरसेवक तसेच भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष विनय डोळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे रामु राठी यांनी आर्वीकरांच्यावतीने आभार मानले. आता या नाट्यगृहाच्या निर्मितीकडे आर्वीकरांचे लक्ष लागले आहे.आर्वीकरांनी मानले आभारआर्वीत नाट्यगृहाच्या रूपाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाची आणखी एक चाबी आर्वीकरांना सुपुर्द केली आहे. या शहराच्या नाट्यगृहाकरिता मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी तथा आर्वीचे पुत्र सुमित वानखेडे यांनी मोलाची मदत केल्याने त्यांचेही आभार मानले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस