डोकेदुखी : बंदोबस्तासाठी नागरिकांची पालिकेकडे धावआर्वी : येथील विविध वॉर्डात सध्या माकडांनी ठिय्या मांडला असून या मर्कटलीलांमुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. या माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी निवेदनातून केली आहे. या मागणीचे निवेदन वनविभाग तसेच पालिका प्रशासनाला देण्यात आले.येथील एम.आय.जी. कॉलनी, कन्नमवारनगर, साईनगर, रेल्वेस्टेशन परिसर, गौरक्षण वॉर्ड, चेरी ले-आऊट, आसोलेनगर येथे माकडांनी धुमाकूळ आहे. या भागासह शहरातील अन्य नागरी वसाहतीत माकडांचा मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे माकडांचा बंदोबस्त करीत नागरिकांना दिलासा देणे गरजेचे झाले आहे. सामान्य नागरिकांना यामुळे विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. सामान्यांसाठी ही बाब चांगलीच डोकेदुखी ठरली आहे. हे माकड टोळीने घरात शिरुन अन्नपदार्थ लंपास करतात. तसेच साहित्याची नासधुस करीत आहे. या माकडांना तातडीने वनविभागाने ताब्यात घेत जंगलात सोडावे. तसेच नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे.(तालुका प्रतिनिधी)
आर्वीत माकडांचा धुमाकूळ
By admin | Updated: September 26, 2015 02:11 IST