शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाई गावासाठी स्वतंत्र सचिव नियुक्त करा

By admin | Updated: January 8, 2017 00:48 IST

नजीकच्या वाई ग्रा.पं. चा कारभार असलेल्या सचिवाकडे चार ग्रामपंचायतींचा कारभा आहे.

सरपंचाची मागणी : जि.प. सीईओंना साकडे रोहणा : नजीकच्या वाई ग्रा.पं. चा कारभार असलेल्या सचिवाकडे चार ग्रामपंचायतींचा कारभा आहे. यामुळे ते १५ ते २० दिवस गावात येऊ शकत नाहीत. परिणामी, गावातील विकास कामे रखडली आहेत. गरजूंना आवश्यक प्रमाणपत्रे मिळण्यातही अडचणी येत आहे. यामुळे वाई ग्रा.पं. मध्ये स्वतंत्र सचिवाची नियुक्त करण्यात यावी, अशी मागणी सरपंच गणेश गचकेश्वर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व आर्वीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे. या मागणीकडे अद्याप लक्ष देण्यात आले नसून कायम सचिव मिळाला नाही. यामुळे आमरण उपोषणाचा मार्ग पत्करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. वाई हे आदिवासी लोकांची वस्ती असलेले गाव आहे. लहान व मोठी पिंपळधरी या कोलाम वस्तींचा या ग्रामपंचायतीमध्ये समावेश आहे. शासन आदिवासींसाठी अनेक अनुदानाच्या य९ाजना राबवित आहे. या सर्व योजनांची माहिती पुरविणे, आवश्यक प्रमाणपत्रे प्रदान करण्याचे महत्त्वाचे काम ग्रामपंचायत सचिवाद्वारे केली जातात; पण या गावात सचिव १५ ते २० दिवसांतून कधीतरी दिसतात. आले तरी ते कधी येतात व कधी जातात, हे ग्रामस्थांच्या लक्षातही येत नाही. सचिव येत नसल्याने ग्रा.पं. च्या कर वसुलीची प्रक्रियाही पूर्णत: ठप्प आहे. परिणामी, ग्रामपंचायतीचे उत्पन्न नाही. पाणी पुरवठा योजनेची देयके थकित आहेत. विद्युत वितरण कंपनीने पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा बंद करण्याची नोटी ग्रामपंचायतीला बजावली आहे. गावातील रस्ते बांधणी, नाल्यावर पावसाळ्यापूर्वी पूल व्हावा यासाठी पाठपुरावा करणे आदी कामांसाठी सरपंचांना सचिवाची साथ गरजेचे असते. यासाठी सरपंचांनी जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी व आर्वीचे गटविकास अधिकारी यांना याबाबत तोंडी व लेखी माहिती दिली होती. वाई ग्रा.पं. ला स्वतंत्र सचिव द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती; पण दोन्ही अधिकाऱ्यांनी ऐकून घेण्यापलिकडे काहीही केले नाही. परिणामी, गावाचा विकास थांबला आहे. ग्रामस्थाां आवश्यक असलेल्या प्रमाणपत्रांसाठी ताटकळावे लागत आहे. नाईलाजाने मागणी पूर्ण करून घेण्यासाठी उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशारा सरपंच गणेश गचकेश्वर यांनी दिला आहे. अधिकाऱ्यांनी मागणीकडे जातीने लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनीही केली आहे.(वार्ताहर)