शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

कर्जमाफीसह स्वामिनाथन आयोग लागू करा

By admin | Updated: April 19, 2017 00:40 IST

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, स्वामिनाथन आयोगाप्रमाणे उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव मिळावा,

शेतकरी हक्क परिषदेतील ठराव : महात्मा फुले समता परिषदेचे आयोजन वर्धा : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, स्वामिनाथन आयोगाप्रमाणे उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव मिळावा, यासाठी स्वतंत्र व प्रभावी कायदा करावा, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी कायद्याची ऐसीतैसी करू नये, असे ठराव शेतकऱ्यांनी एकमताने पारित केले. महात्मा फुले समता परिषदेद्वारे शेतकरी हक्क परिषद घेण्यात आली. यात शासन, प्रशासनाच्या निषेधासह अन्य पारित ठराव शासनाला सादर केले जाणार आहे. हक्क परिषदेमध्ये कुण्याही प्रस्थापित नेत्यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते, हे विशेष! शेतकऱ्यांनीच आपल्या व्यथा, वेदना या परिषदेत मांडाव्या. त्यावर चर्चा करावी आणि त्यातून सर्व शेतकऱ्यांनी सामूहिकपणे संघटीत होऊन मार्ग काढावा, ही संकल्पना होती. शेतकरी प्रश्नांवर विचार मांडण्यासाठी हे व्यासपीठ सर्वांना खुले ठेवले होते. शेतकरी हक्क परिषदेत नागपूर समृद्धी महामार्गात जमिनी जाणाऱ्या ३५ गावांतील शेतकरी हजर होते. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज त्वरित माफ करण्यात यावे, यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी या हक्क परिषदेमध्ये आले होते. यात शेतकरी महिलांचाही समावेश होता. परिषदेत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी. महाराष्ट्रात व देशात स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करून उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याचा प्रभावी कायदा करावा. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गात जिल्हाधिकारी व त्यांच्या संमतीने चाललेल्या राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची दंडेलशाही बंद करावी. नागपूर-मुंबई महामार्गातील लँड पुलींग ही कायद्यातील बेकायदेशीर तरतूद त्वरित रद्द करावी, नवनगरांच्या नावाखाली वसणारी शहरे योजनेतून रद्द करावी. या महामार्गाची गरज नसल्याने तो रद्द करावा. जर शासनाला वाटाघाटीने शेतकऱ्यांकडून जमिनी हव्या असतील तर भूसंपादन कायद्याप्रमाणे पाचपट म्हणजे ८० लाख रुपये एकर जमिनीचा भाव जाहीर करावा व नंतरच वाटाघाटी कराव्या. सत्तारुढ पक्षाचे खासदार, आमदार व अन्य लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या वरील मागण्यांबाबत जिथे भेटतील वा त्यांच्या सभेत जाऊन जाब विचारावा. यापुढे शेतकऱ्यांनी स्वत:च नेतृत्व करून आत्महत्येचा विचारही मनात आणू नये. शेतकऱ्यांनी संघटीतपणे निराशग्रस्त शेतकऱ्यांना आधार देत त्यांच्या समस्या सोडवाव्या, असे विविध ठराव घेण्यात आहे. ते शासनाला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आले आहेत. महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून शेतकरी हक्क परिषदेला प्रारंभ झाला. यावेळी प्रा. दिवाकर गमे, विनय डहाके, अ‍ॅड. महेंद्र धोटे, मसुद खान पठाण, गंगाधर मुडे, रामराव मुडे, रमेश भोपळे, प्रा. मनोहर सोमनाथे, भाऊराव काकडे, सुधीर पांगुळ आदी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)