शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

केळझर येथील उत्खननात सापडली पुरातन बावडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 00:50 IST

येथील सिद्धीविनायक गणपती मंदिर परिसराच्या पूर्व दिशेने सुरू असलेल्या उत्खननात प्राचीन चिरेदार पाषाणाची विहीर (बावडी) आढळून आली.

ठळक मुद्देप्राचीन मंदिर व मूर्तीचेही अवशेष : तेरा ते चौदाच्या शतकातील काळ असण्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : येथील सिद्धीविनायक गणपती मंदिर परिसराच्या पूर्व दिशेने सुरू असलेल्या उत्खननात प्राचीन चिरेदार पाषाणाची विहीर (बावडी) आढळून आली. तसेच देवतांचे भग्नावशेष, जैन तिर्थकरांच्या मूर्तीचे अवशेष, भगवान शंकराचे वाघ, डमरु, शिवलींगाचे भग्नावशेष मिळाल्याने केळझर व जुन्या एकचक्रीनगरला प्राचीन ऐतिहासीक वारसा असल्याचे पुन्हा सिध्द झाले आहे.राष्टÑसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातन पदव्युत्तर विभागाच्या प्रमुख डॉ. प्रिती त्रिवेदी यांच्या मार्गदर्शनात सोळा विद्याथ्याची चमू अभ्यासाचा एक भाग म्हणून मागील एक महिन्यापासून उत्खननाचे काम करीत आहे. त्यांच्या दिमतीला गावातील १५ ते २० मजूर कामाला आहेत. सिध्दीविनायक गणपती मंदिराचे अध्यक्ष माधवराव ईरूटकर व सचिव महादेवराव कापसे यांचेही सहकार्य लाभत आहे. येथील खोदकामात प्राचीन बावडी (चिरेदार पाषाणाच्या पायऱ्यांची विहीर) दृष्टीपथास आली.सध्या हे काम पुर्णत्वास गेले नसून या विहिरीत पाणीसाठा असल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. त्याचप्रमाणे जैन तिर्थकारांच्या मूर्तीचे अवशेष, देवी- देवतांच्या मूर्तीचे अवशेष, पुरातन विटा, खापर आदी वस्तू मिळाल्यात.याच परिसरात गणेश तलावाच्या बाजूला खोदकाम सुरु आहे. तेथील खोदकामात भगवान शंकराचे वाघ, डमरु व शिवलींगाचे भग्नावशेष तसेच मंदिराच्या कळसावर असणारी चिरेदार पाषाणाची कोरीव कलाकृती मिळाल्याने याठिकाणी भूमिगत भगवान शंकराचे मंदिर असल्याचा कयास लावल्या जात आहे. त्याच दृष्टीने पुढील खोदकामाला गती देण्यात आली आहे.या उत्खननात मिळालेले संपूर्ण अवशेष हे प्राचीन वाकाटकाच्या काळानंतरचे व यादव कालीन (हेमाडपंथीय) इसवी सन १३ किंवा १४ व्या शतकातील असल्याचा अंदाज या विभागाच्या प्रमुख डॉ. प्रिती त्रिवेदी यांनी व्यक्त केला आहे. तसेच केळझर गावाच्या सभोवताल दीड ते दोन किलो मीटरच्या परिघात भूमिगत जैन व हिंदू मंदिरांचे मोठ्या प्रमाणात अवशेष असल्याचाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.मागील वर्षीसुध्दा याच काळात डॉ. प्रिती त्रिवेदी यांच्या मार्गदर्शनात या विभागाच्या विद्यार्थ्यांनी येथे उत्खनन केले होते. त्यावेळी मृत अश्वाचा सांगाडा आणि मातीची भांडी, काचेचे मणी आदी वस्तू मिळाल्या होत्या. प्रत्येक वेळी उत्खननात मिळणाºया प्राचीन ऐतिहासीक वास्तू व वस्तुंमुळे या एकचक्रीनगरला प्राचीन ऐतिहासिक वारसा असल्याचे सिध्द होत आहे. हा भूभाग ऐतिहासिक वास्तूंचा ठेवा असल्याचेच आता दिसून येत आहे.