शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

व्हीजेएमची पवनारात डेंग्यूविरोधी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 01:06 IST

जिल्ह्यात सध्या डेंग्युने चांगलेच डोके वर काढले आहे. यावर आळा बसविण्याकरिता आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे. त्यांच्या मदतीला वैद्यकीय जनजागृती मंच आला असून शासकीय आणि सामाजिक दोन्ही भागातून.....

ठळक मुद्देजिल्ह्यात सध्या डेंग्युने चांगलेच डोके वर काढले आहे. यावर आळा बसविण्याकरिता आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सध्या डेंग्युने चांगलेच डोके वर काढले आहे. यावर आळा बसविण्याकरिता आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे. त्यांच्या मदतीला वैद्यकीय जनजागृती मंच आला असून शासकीय आणि सामाजिक दोन्ही भागातून मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू असल्याचे दिसून आले आहे.जिल्ह्यात पहिले विरूळ आणि आता पवनार या भागात डेंग्युचे रुग्ण आढळून आले आहे. याच संवेदनशील मुद्यावर सतत कार्यरत असलेले वैद्यकीय जनजागृती मंचाने विरूळनंतर पवनारला भेट देत तिथे डेंग्यू आजाराबद्दल लोकजागृती केली. डेंग्युवर प्रतिबंध लावण्याकरिता स्वच्छतेशिवाय पर्याय नाही. यामुळे ग्रामीण भागात स्वच्ठता आणि रोगाच्या लक्षणाची माहिती देण्यात आली आहे.वैद्यकीय जनजागृती मंचाच्यावतीने आतापर्यंत जिल्ह्यात जवळपास १५७ लोकजागृती कार्यक्रमातून विविध आजाराची माहिती दिली आहे. तसेच सेप्टिक टँकच्या व्हेंट पाईपला जाळ्या लावून दिल्या. याचवेळी लोकांना परिसर स्वच्छतेचे आवहन करीत डास निर्मूलनाची शपथ दिली.डेंग्यूविषयी सविस्तर माहिती असलेली परिपत्रके पण बाजार चौकात आणि परिसरात वाटण्यात आली. मार्गदर्शन करताना व्हीजेएमचे डॉ. सचिन पावडे, डॉ. शंतनू चव्हाण, डॉ. यशवंत हिवंज, डॉ. राजेश सरोदे, डॉ. प्रशांत वाडीभस्मे, डॉ. अलोक बिस्वास, डॉ. आनंद गाढवकर, श्याम भेंडे यांची उपस्थिती होती.वैद्यकीय जनजागृती मंचाच्यावतीने गुरुवारी पवनारच्या ग्रामस्थांशी संवाद साधला. इथेही डेंग्यू बाबत मार्गदर्शन केले. डेंग्युची लक्षणे आणि त्यावर उपाययोजनांची माहिती दिली. गावातील बाजार चौकात लोकांना आरोग्य विषयी शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाला सरपंच अजय गांडोळे, ग्रा.प्ं. सदस्य अशोक भट, नंदा उमाटे, वर्षा बांगडे, अर्चना डगवार, ज्योत्सना गवळी, आरोग्य केंद्रातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. 

टॅग्स :dengueडेंग्यू