शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूविरोधी जनजागृतीची चळवळ लोकाभिमुख झाली पाहिजे

By admin | Updated: August 12, 2016 01:48 IST

डेंग्यू हा एडिस डांसामुळे पसरणारा विषाणुजन्य आजार आहे. या आजारात रूग्णाचे प्लेटलेट कमी झाल्यामुळे रक्तस्त्राव व मज्जाघातामुळे मृत्यूसुद्धा ओढवू शकतो.

अमरदीप नंदेश्वर : १५०० विद्यार्थ्यांनी घेतली शपथ पुलगाव : डेंग्यू हा एडिस डांसामुळे पसरणारा विषाणुजन्य आजार आहे. या आजारात रूग्णाचे प्लेटलेट कमी झाल्यामुळे रक्तस्त्राव व मज्जाघातामुळे मृत्यूसुद्धा ओढवू शकतो. या मरणप्राय आजाराविरोधात शासकीय स्तरावर राबविल्या जाणारी डेंग्यूविरोधी मोहीम ही आरोग्य विभागापुरती मर्यादित न राहता ती विद्यार्थी व शाळांतूनही प्रसारीत व्हावी. लोकाभिमुख होवून जनमाणसाची चळवळ झाली पाहिजे, असे मत नाचणगाव प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमरदीप नंदेश्वर यांनी व्यक्त केले. शालेय डेंग्यू जनजागृती मोहिमेच्या सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी १५०० विद्यार्थ्यांना डेंग्यु मुक्तीची शपथ दिली. तीव्र ताप, डोकेदुखी अंगावर पूरळ येणे, तीव्र पोटदुखी व रूग्णास होणारा रक्तस्त्राव अशाप्रकारची लक्षणे असलेल्या डेंग्यू या आजारावर कोणताही ठोस उपचार नाही. या आजारावर उपचार करण्यापेक्षा सामाजिक स्तरातून सतर्कता बाळगत प्रतिबंध केला पाहिजे. गावागावातून परिसर स्वच्छता, नाल्यांची साफसफाई व नाल्या वाहत्या करणे, साठवलेली पाण्याची भांडी आठवड्यातून एकदा धुवून पुसून कोरडी करणे, कोरडा दिवस पाळणे गप्पी मासे साचलेल्या पाण्यात सोडणे, अशा प्रकारच्या उपायोजना ग्रामीण व शहरी स्तरातून घराघरातून राबविल्या गेल्या तरच आपण आपले गावच नव्हेतर संपूर्ण जिल्हा सुद्धा डेंग्यूमुक्त करू शकू, असे आवाहन नंदेश्वर यांनी केले. जिल्ह्यात १ ते १५ आॅगस्टपर्यंत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रवीण धाकटे यांच्या मार्गदर्शनात शालेय डेंग्यू जागृती मोहीम राबविल्या जात आहे. यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य मनोहर वाके, प्रा.आ. केंद्राचे वैज्ञानिक अधिकारी चंद्रकांत शहाकार यांनी मार्गदर्शन केले. प्रा.आ. केंद्राचे आरोग्य सहाय्यक शरद डांगरे, प्रशांत आदमने, आरोग्य सेवक गजानन वानरे, दिनेश भारती, अजय पवार यांच्या सहकार्याने २० गावात किटकशास्त्रीय सर्व्हेक्षण, गप्पी मासे सोडणे, विशेष रक्त तपासणी, विविध स्पर्धा घेण्यात येणार आहे.(तालुका प्रतिनिधी)