शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
4
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
7
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
8
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
9
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
10
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
11
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
12
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
13
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
14
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
15
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
16
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
17
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
18
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
19
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
20
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!

१०० फूट अंतरावरच खोदली दुसरी विहीर; ओलित प्रभावित

By admin | Updated: April 30, 2015 01:53 IST

दोन शेतांमध्ये असलेल्या विहिरींमध्ये किमान ५०० फुट अंतर असावे, असा नियम आहे;

सिंदी (रेल्वे) : दोन शेतांमध्ये असलेल्या विहिरींमध्ये किमान ५०० फुट अंतर असावे, असा नियम आहे; पण मौजा डोरली येथे १०० फुट अंतरावर शेतकऱ्याने विहीर खोदली़ यामुळे पूर्वी जुन्या विहिरीचे पाणी तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे़विजय पुसाराम बोरकर यांचे मौजा डोरली सर्व्हे क्ऱ १०९ मध्ये आराजी ४.०८ हे.आर. शेत आहे़ या शेतात १५ वर्षांपासून विहीर आहे़ शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो़ त्यांच्या शेतालगत किशोर श्रीराम बोरकर यांचे शेत आहे़ त्यांनी नियमांना तिलांजली देत विजय यांच्या विहिरीपासून केवळ १०० फुट अंतरावर विहीर खोदली़ शिवाय विहिरीमध्ये आडवे बोअर करून जुन्या विहिरीतील पाणी पळविले़ यामुळे विजय बोरकर यांना ओलितापासून वंचित राहावे लागले़ याबाबत वरिष्ठ भुवैज्ञानिक वर्धा, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली; पण अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नाही़ शेतात खोदलेल्या विहिरीपासून ५०० फुटाच्या आत भूजल अधिनियम १९९३ च्या कलम ३ नुसार दुसऱ्या विहिरीचे खोदकाम वा बांधकाम करता येत नाही, असा नियम आहे; पण किशोर बोरकर यांनी १०० फुट अंतरावरच विहीर खोदली़ यामुळे नवीन विहिरीचे खोदकाम व बांधकाम हे बेकायदेशीर असून ती विहिर त्वरित बुजविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे़ जिल्हा प्रशासनाने याबाबत कारवाई न केल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचेही शेतकरी विजय बोरकर यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे़(प्रतिनिधी)