९ आॅगस्ट रोजी आदिवासी दिन : भाजपा अनुसूचित जमाती आघाडीचे मुख्यमंत्र्यांना साकडे वर्धा : आदिवासी या धर्तीवरचे प्रथम वासी आहे. १९९४ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या संयुक्त बैठकीत ९ आॅगस्ट हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस’ म्हणून साजरा करावा, असा ठराव संमत करण्यात आला होता. यामुळे आदिवासी दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी भाजपा अनुसूचित जमाती आघाडीने केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. आदिवासी लोकांनी प्रत्येक स्तराच्या निर्णय प्रक्रियेत सक्रीय सहभागी होण्याची गरज आहे. आदिवासी या शब्दाचा अर्थ याच शब्दात दडला आहे. आदि म्हणजे प्रथम वासी म्हणजे निवासी म्हणजे प्रथम वासी. आज तांत्रिक युगात विकासाच्या आधुनिकीकरणाच्या नावाखाली आदिवासींच्या बहुमूल्य सांस्कृतिक वारसा पारंपरिक ज्ञान व नैसर्गिक संपत्ती याचा ऱ्हास होत आहे. असे करण्यास त्यांना भाग पाडले जात आहे. हे असेच सुरू राहिले तर लवकरच आदिवासींचे अस्तित्व रसातळाला जाण्याची भीती आहे. आदिवासी बोलीभाषेतील साहित्याला प्रोत्साहनाची गरज आहे. आदिवासी क्रांतीकारांचा गौरवशाली इतिहास जगापूढे मांडून त्यांच्या निष्ठा आणि प्रेरणांचा सन्मान होणे गरजेचे आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आदिवासी दिन साजरा करण्याचा प्रयत्न आदिवासी समाज बांधव करणार आहेत. इंटरनेट आणि घटनांचा परिणाम आदिवासी समाज जागृतीवर होत आहे. युवा वर्ग सामाजिक कार्यात सहभाग घेत आहेत. आदिवासी विकासात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करून ती उर्जा आदिवासींची सांस्कृतिक ओळख सामाजिक स्वावलंबन, रचनात्मक विकास यासाठी उपयोगात यावे म्हणून आदिवासी समाज बांधवांच्या भावनांचा योग्य तो विचार करून राज्य शासनाने ९ आॅगस्ट रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती आघाडीच्यावतीने करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन मडावी, महामंत्री महादेव कासार, देवराव मडावी, शंकर आडे, आशिष खंडाते, पुंडलिक श्रीरामे, राजू कौरती, पवन गेडाम, शंकर उईके, कुसूम मडावी, संजीवनी मसराम, रवी कुमरे, प्रभाकर उईके, अशोक उईके, नारायण आत्राम, मेघा मडावी, यशवंत धुर्वे, गणपत भलावी, देविदास सिडाम, दिलीप श्रीरामे, अविनाश परवेकर, प्रकाश खुडसंगे, श्रीकांत धुर्वे, देवेंद्र मडावी, नारायण आत्राम, विजय दंडाजे, भाऊराव पंधरे, श्याम सलामे, शंकर मसराम, अमोल उईके, अमोल डोघे, अविनाश उईके, अरुण किन्नाके, प्रवीण कुमरे, तालुकाध्यक्ष जंगलू मसराम, नरेश कोराम, शहराध्यक्ष महेश तसेच गणेश मसराम व पदाधिकारी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)
आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा
By admin | Updated: August 7, 2016 00:18 IST