शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

अंनिसने केला हमदापूरच्या भोंदूबाबाचा भंडाफोड

By admin | Updated: April 3, 2017 00:49 IST

होत असलेला शारीरिक त्रास करणी केल्यामुळे आहे. त्यावर वैद्यकीय उपचार कुचकामी ठरतात,

दहेगाव पोलिसांत गुन्हा दाखल : वैद्यकीय उपचाराला विरोध दर्शवत मंत्रतंत्राने करीत होता उपचार वर्धा : होत असलेला शारीरिक त्रास करणी केल्यामुळे आहे. त्यावर वैद्यकीय उपचार कुचकामी ठरतात, असे म्हणत मंत्रतंत्राने उपचार करणाऱ्या परशराम पराते नामक मांत्रिक तथा बाबाचा अ.भा. अंनिस वर्धा व सेलू तालुका शाखेने भंडाफोड केला. ही घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी परशराम पराते याच्यावर महाराष्ट्र नरबळी अघोरी व इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी कृत्यांना प्रतिबंधक व काळाजादू निर्मूलन कायद्याच्या अनुसूचि ३, ५, ८ अंतर्गत गुन्हा नोंदवल्याची माहिती दहेगाव पोलिसांनी दिली दहेगाव पोलीस ठाण्यांतर्गत हमदापूर येथील परशराम पराते (७०) हा गावात डॉ. पराते नावाने प्रसिद्ध आहेत. हा बाबा मंत्र तंत्राच्या सहायाने उपचार करीत होता. डॉ. पराते आयुर्वेदिक उपचाराने अनेक व्याधी दूर करतात अशी माहिती मिळाल्याने पराग हेमचंद्र दांडगे (३०) रा. रामनगर हे बाबाकडे गेले. तेथे मात्र बाबाने त्यांना आयुर्वेदीक औषध देण्याऐवजी तुमच्यावर कोणीतरी करणी केली आहे. शिवाय तुमच्यावर असलेली करणी ही आठ किलो वजनाची आहे, असे सांगितले. ही करणी काढायला पराते बाबाने दांडगे यांना मंतरलेले सात लिंबू, एक लाल धागा व अंगाऱ्याची पुडी दिली. शिवाय एक महिन्यात बरं वाटेल. डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. दुसरा इलाज केला तर दुखणे आणखी वाढेल अशी धमकीही दिली. यावेळी १५० रुपये घेऊन पुढील वेळी ताबीज देईल. त्याचे ३५० रुपये सोबत आणण्याची सूचना बाबाने केली. सदर डॉक्टर भोंदू असल्याचे पराग दांडगे यांना लक्षात येताच त्यांनी अ.भा. अंनिसचे वर्धा जिल्हा संघटक तथा शासनाच्या जादूटोणा विरोधी कायदा प्रचार समितीचे संयोजक पंकज वंजारे यांच्याकडे बाबाविरूद्ध लेखी तक्रार दिली. वंजारे यांनी प्रकरणाची शहानिशा करण्याकरिता जिल्हा अध्यक्ष हरिष इथापे, राज्य सल्लागार संजय इंगळे तिगावकर, सचिव निलेश गुल्हाने, उपाध्यक्ष डॉ. धनंजय सोनटक्के, सहसंघटक आकाश जयस्वाल, वर्धा तालुका अध्यक्ष प्रा. एकनाथ मुरकुटे यांच्या मदतीने वर्धा व सेलू तालुक्यातील १५ कार्यकर्त्यांना बाबाच्या दरबारात पाठविले. बाबा मंत्र तंत्राचा चमत्काराचा व आपल्यात दैवीशक्ती असल्याचा आभास निर्माण करून लुबाडणूक करतो हे कार्यकर्त्यांना लक्षात आहे. यावरून त्यांनी दांडगे यांना दहेगाव पोलिसात तक्रार करण्यास सांगितले. तक्रारीवरून शनिवारी पोलीस निरीक्षक कमलेश जयस्वाल, अंनिसचे कार्यकर्ते बाबाच्या दरबारात भक्त म्हणून पोहचले. विवाहित कार्यकर्त्याने आपला विवाह झाला नाही असे बाबाला सांगितल्यावर बाबाने नेहमीच्या पद्धतीने आपल्यात अंतेद्रीयशक्ती संचारल्याचे भासवून विवाह न व्हावा म्हणून तुमच्यावर शेजारच्या व्यक्तीने करणी केल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, त्या व्यक्तीचा विवाह झाला असून त्याला एक अपत्य आहे. हे बाबाला दरबारात सांगताच बाबाची भांबेरी उडाली. याच वेळी आपण पराग दांडगेला करणी केली आहे व उपचार करू नका असे म्हटल्याचे पोलिसांसमोर बाबाने कबूल केले. दरबारात अंनिसच्या कार्यकर्त्यांनी बाबांचे पितळ उघडे पाडताच अनेक भक्तांनी काढता पाय घेतला. पोलिसांनी घेतलेल्या झडतीत बाबांकडून अनेक औषधांचा साठा मिळाला. बाबावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याची अधिक चौकशी करीत आहेत. यावेळी अ.भा. अंनिस जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. सुचिता ठाकरे, वर्धा तालुका संघटक रवी पुनसे, सचिव शुभम जळगावकर, सहसचिव भूषण मसने, संपर्क प्रमुख आशीष मोडक, सतीश इंगोले, सहसंघटक पी.के. खोबे, प्रा. कमलेश मानकर, मोहित सहारे, आशिष नंदनवार, प्रिया मून, प्रफुल नरानिया, स्वप्नील मोडक, जतीन रननवरे, घनश्याम माहुरे, संजय अवचट, राजेश वेले, नरेश चरडे, सुमित उगेमुगे आदींनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)