शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
4
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
5
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
6
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
7
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
8
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
9
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
10
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
11
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
12
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
13
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
14
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
15
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
16
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
17
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
18
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
19
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
20
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!

आंजीला होणार ग्रामीण रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 21:24 IST

आर्वी तालुक्यातील आंजी (मोठी) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रात परिसरातील जवळपास ३४ गावांचा समावेश होतो. तसेच हे गाव आर्वी- वर्धा या राष्ट्रीय महामार्गावर असल्याने येथे ग्रामीण रुग्णालय सुरु करण्याची मागणी जिल्हा परिषदच्या आरोग्य व शिक्षण सभापती जयश्री सुनिल गफाट यांनी सातत्याने लावून धरली होती.

ठळक मुद्देशासनाची मंजुरी : मान्यतेकरिता आराखडा सादर करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आर्वी तालुक्यातील आंजी (मोठी) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रात परिसरातील जवळपास ३४ गावांचा समावेश होतो. तसेच हे गाव आर्वी- वर्धा या राष्ट्रीय महामार्गावर असल्याने येथे ग्रामीण रुग्णालय सुरु करण्याची मागणी जिल्हा परिषदच्या आरोग्य व शिक्षण सभापती जयश्री सुनिल गफाट यांनी सातत्याने लावून धरली होती. अखेर शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ६ आॅगस्टला प्राथमिक आरोग्य कें द्राच्या ठिकाणी नव्याने ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्याला मंजुरी दिली आहे.आंजी (मोठी) हे जिल्हा परिषदेचे सर्कल असून आंजी या गावातून आर्वी-वर्धा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या परिसरातील जवळपास ३४ गावांच्या आरोग्याची जबाबदारी या प्राथमिक आरोग्य केंद्रावर होती. तसेच पिपरी (मेघे), नालवाडी व मसाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाजही आजीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातूनच चालायचे. त्यामुळे येथील कामाचा आवाका लक्षात घेता आंजीमध्ये ग्रामीण रुग्णालयाची स्थापना करण्याची मागणी २०१४ पासून सभापती गफाट यांनी लाऊन धरली होती. अखेर या मागणीला शासनाची मान्यता मिळाली आहे. या रुग्णालयाकरिता विहित पद्धतीने जागा अधिग्रहीत करुन बांधकाम करण्याकरिता अंदाज आराखडे तयार करुन प्रशासकीय मान्यतेकरिता सादर करावे. तसेच पदनिर्मिती करण्याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल,असे आदेशात नमुद केले आहे.वाढती लोकसंख्या आणि कामाचा आवाका लक्षात घेऊन ग्रामीण रुग्णालयाची मागणी करण्यात आली. आमदार अनिल सोले यांच्याकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर त्यांनी स्वत: लक्ष दिले. परिणामी तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंजुरी दिली. त्यानंतर या प्रस्तावाला वर्ध्यात येण्याच्या तीन दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. या सर्वांच्या सहकार्याने येथे ग्रामीण रुग्णालय बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता लवकरच पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल.जयश्री सुनील गफाट, सभापती, आरोग्य व शिक्षण समिती

टॅग्स :hospitalहॉस्पिटल