शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अंनिस व आयटकचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 22:30 IST

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर तसेच ज्येष्ठ विचारवंत आयटकचे पदाधिकारी डॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपास थंडावला आहे.

ठळक मुद्देडॉ. दाभोळकर व डॉ. पानसरे यांच्या हत्येचा निषेध

ऑनलाईन लोकमतवर्धा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर तसेच ज्येष्ठ विचारवंत आयटकचे पदाधिकारी डॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपास थंडावला आहे. या विरोधात निषेध म्हणून महात्मा गांधी पुतळ्याजवळ महाराष्ट्र अंनिस आणि आयटकच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पोहोचविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सोपविण्यात आले. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शहा यांनी स्वीकरले.डॉ. नरेंद्र दाभोळक व डॉ. गोविंद पानसरे यांच्यावर सनातन तसेच हिंदु जनजागृती यांच्या साधकांनी गोळ्या झाल्याचे प्रतिज्ञापत्र सीबीआयाने उच्च न्यायालयात सादर केले. या दोन्ही संस्थेचे साधक विनोद तावडे आहेत. या हत्याकांडाचा मुख्य सुत्रधार व त्याचा साथीदार यांना अटक होवूनही तपास भरकटल्याने न्यायालयाने या दोघांनाही जामीन दिला. न्यायालयाने सीबीआय, सीआयडी राज्य सरकार, सरकारी वकील यांच्यावर ताशेरे ओढले. मात्र तपासाला अजूनही योग्य दिशा मिळाला नाही.त्यानंतर एम.एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली. या हत्यांत मडगांव बॉम्बस्फोटात फरार असलेले व एनआयएनने फरार घोषित केलेले सनातनचे साधक सारंग अकोलकर, प्रवीण निंबकर, रूद्र पाटील, जयप्रकाश हेगडे असल्याचे समोर आले. फक्त विनोद तावडे व समीर गायकवाड या साधकांना अटक झाली. या पलिकडे काहीच कार्यवाही झाली नसल्याने निषेध नोंदविण्यात आला. निवेदन देताना दिलीप उटाणे, गजेंद्र सुरकार, मनोहर पचारे, वामनराव भेंडे, गोवर्धन टेंभुर्णे, सुधीर पांगुळ, सुनील ढाले, राजेश इंगोले, गोपाल काळे, मैना उईके, वंदना कोळमकर, मंगला इंगोले उपस्थित होते.