शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पशुपालक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 23:23 IST

अंतोरा परिसरातील आठ गावांमध्ये पावसामुळे जनावरांना घटसर्प आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. पशुसंवर्धन दवाखानात डॉक्टर नसल्याने खाजगी महागडा उपचार करून शेतकरी वैतागले आहे. पशुसंवर्धन विभागाने तात्काळ लसीकरण व उपचार मोफत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देआठ गावातील : जनावरांना घटसर्प आजाराची लागण
<p>लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : अंतोरा परिसरातील आठ गावांमध्ये पावसामुळे जनावरांना घटसर्प आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. पशुसंवर्धन दवाखानात डॉक्टर नसल्याने खाजगी महागडा उपचार करून शेतकरी वैतागले आहे. पशुसंवर्धन विभागाने तात्काळ लसीकरण व उपचार मोफत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.मागील पंधरा दिवसापासून रिपरिप पाऊस झाला. पावसाळ्यातील दूषित पाणी किडीने भरलेला चार जनावरांच्या खाण्यात गेला. त्याचा परिणाम जनावरांच्या आजारावर झाला. त्यातच घटसर्प या जीवघेण्या आजाराची लागण झाल्याने मोठ्या प्रमाणात जनावरे घरीच गोठ्यात बांधून ठेवावी लागत आहे. अंतोरा, नवीन अंतोरा, माणिकनगर, बेलोरा, खंबीत, देलवाडी, जोलवाडी, चिंचोली या गावातील पशुंसाठी अंतोरा येथे पशुवैद्यकीय दवाखाना आहे. मात्र येथे गेल्या ३ महिन्यांपासून पशुधन अधिकारी नाही. त्यामुळे अतिरिक्त कारभार भारसवाडा येथील अधिकाºयाकडे आहे. त्यांच्याकडे आधीच जास्त काम असल्याने अंतोराकडे येण्यास वेळ नसल्याची माहिती मिळाली आहे.शेतकरी दवाखान्यात येरझारा मारून शकले आहे. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डी.एन. काळे यांचीही बुलढाणा जिल्ह्यात अचानक बदली झाली. त्यांच्या जागेवर डॉ. कांबळे रूजू झाल्या. मात्र त्यांनी पशुवैद्यकीय केंद्राकडे पाहिजे तसे लक्ष दिले नाही. त्यामुळे समस्या गंभीर बनत चाचली आहे. शेतकºयांच्या संकटाची दखल घेण्यात आली नसल्याने संताप व्यक्त केल्या जात आहे.राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने जनावरांच्या आजाराच्या औषधीची खरेदी राज्य स्तरावरच केली नाही. त्यामुळे स्थानिक पशु वैद्यकीय दवाखान्यांमध्ये औषध उपलब्ध नाही. शासकीय दवाखान्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी नियमितपणे सेवा देत नाही. एका पशुवैद्यकीय अधिकाºयाकडे दोन ते तीन गावांचा पदभार आहेत. त्यामुळे ते वेगवेगळ्या दिवशी उपलब्ध होतात त्यामुळे पशुपालकाच्या अडचणी वाढत आहे. तर काही पशुवैद्यकीय अधिकारी खासगी व्यवसायही करतात त्यामुळे त्यांचे प्राधान्य दुसरीकडेच राहते. असे दिसून येते.दोन हजार जनावरे आजाराच्या विळख्यातघटसर्पाच्या लागणीमुळे आठ गावातील दोन हजारावर जनावर आजारी आहे. त्यांना धड उभेही राहता येत नाही. अनेक गायी, बैल, कालवड, गोºहे आजारामुळे दगावण्याच्या स्थितीत आहे. त्यांना तात्काळ लसीकरण करण्याची गरज आहे. जिल्हा पशुसंवर्धन अधिकाºयांनी दखल घेण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. पावसाळ्यापूर्वी नियोजन करण्यात आले नाही.