शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांचे खाद्य मनुष्याच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 22:03 IST

समाजातील आर्थिक दुर्बल व विविध योजनांचे लाभार्थी ठरणाऱ्या गरजुंना शासकीय धान्य वितरण प्रणालीच्या माध्यमातून स्वस्त धान्य अतिशय अल्प दरात दिले जाते. परंतु अतिशय दर्जाहिन धान्य सध्या स्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यात येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देस्वस्त धान्य दुकानातील प्रकार : नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी): समाजातील आर्थिक दुर्बल व विविध योजनांचे लाभार्थी ठरणाऱ्या गरजुंना शासकीय धान्य वितरण प्रणालीच्या माध्यमातून स्वस्त धान्य अतिशय अल्प दरात दिले जाते. परंतु अतिशय दर्जाहिन धान्य सध्या स्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यात येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकरणाची जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.कुठलेही कुटुंब आर्थिक अडचणीमुळे उपाशी राहू नये या उद्देशाने गरजू व विविध योजनेतील लाभार्थी ठरणाºया कुटुंबियांना शासनाच्यावतीने अतिशय अल्प दरात गहू, तांदूळ व डाळ तसेच साखर वितरीत केली जाते. मात्र, गरिबांच्या वाट्याच्या या शासकीय धान्यावर धनदांडग्यांचा व शासकीय धान्याचा काळा बाजार करणाऱ्यांचा डोळा राहत असल्याचे अनेक कारवाईत पुढे आले आहे. असे असले तरी साधे जनावरही खाणार नाही असे निकृष्ट दर्जाचे शासकीय धान्य सध्या येथील स्वस्त धान्य दुकानातून वितरीत होत असल्याने नागरिकांकडून आश्चर्यच व्यक्त केले जात आहे.येथील गजानन रंदळे हे स्थानिक स्वस्त धान्य दुकानात धान्य घेण्यासाठी गेले असता त्यांना निकृष्ट दर्जाचे गहू देण्यात आला. विचारणा केली असता त्यांना उडवा-उडवीचे उत्तर देण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या भागातील लाभार्थ्यांना नेहमीच निकृष्ट दर्जाचे शासकीय धान्य वितरीत करण्यात येत असल्याच्या तक्रारी असून याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही आहे.नव्या प्रणालीने वाढविली डोकेदुखीस्वस्त दुकानात शासकीय धान्य घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांना स्वस्त धान्य दुकानदाराकडून तुमची आर. सी. नसल्याचे सांगत धान्य देण्यास टाळाटाळ केली जाते. इतकेच नव्हे तर यंदा धान्य वेळीच आले नसून काही दिवसांनी या असेही सांगण्यात येते. शासनाच्यावतीने धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता यावी, यासाठी सध्या नवीन प्रणालीचा वापर होत आहे. परंतु, ही प्रणाली स्वस्त धान्य दुकानदारांसह लाभार्थ्यांच्या अडचणीत भर टाकणारीच ठरत आहे.विरुळ येथील स्वस्त धान्य दुकानात गेलो. दुकानदाराने धान्यही दिले. परंतु, ते अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. विचारणा केली असता वरूनच तसा माल आल्याचे स्वस्त धान्य दुकानदाराने सांगितले. निकृष्ट दर्जाचे हे शासकीय धान्य खाऊन आम्ही आता आमची प्रकृती बिघडवायची काय?- गजानन रंदळे, लाभार्थी, विरुळमी आज दुकानात नव्हतो. शासकीय धान्याचा माल दुकानापर्यंत आणताना एखादे पोते खराब आले असावे. शिवाय त्यातीलच धान्य वाटप करण्यात आले असावे. लाभार्थ्याने ते निकृष्ट दर्जाचे धान्य परत द्यावे त्यांना दुसरे गहू देण्यात येईल.- मधुकर माजरखेडे, स्वस्त धान्य दुकानदार, विरुळ.