हिंगणघाट : येथील भारत दिनांत विद्यालयाचे कर्मचारी अनिल भोस्कर यांची आत्महत्या नसून हत्याच आहे, याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिसांनी करून दोषींवर कारवाई व पीडिताच्या कुटुंबाला अनुकंपा अंतर्गत नोकरी आणि नियमानुसार आर्थिक लाभ द्या, या मागणीकरिता महाराष्ट्र राज्य परीट सेवा मंडळाच्यावतीने येथील उपविभागीय कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे देण्यात आले. उपविभागीय कार्यालयात सुरेेंद्र दांडेकर यांना शिष्टमंडळातर्फे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शिष्यमंडळात म.रा.प.सेवा मंडळाचे प्रदेश अध्यक्ष देवराव सोनटक्के, संघटक सचिव संजय मिलकर, जिल्हा अध्यक्ष अशोक लोणकर, राकेश मोतीकर, माणिक भोसकर, अशोक क्षीरसागर, प्रवीण काटकरे, ज्ञानेश्वर भोस्कर, मनसेचे अमोल बोरकर, खिखरकर, खापरे, आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
अनिल भोस्कर मृत्यू प्रकरणाला न्याय द्या
By admin | Updated: December 20, 2014 01:56 IST