शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त महिलांची पोलीस ठाण्यावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 22:17 IST

राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर जाम चौरस्ता येथे गेल्या ४ दिवसांपासून पारधी समाजातील ६ जणांनी गावठी दारूविक्रीचा व्यवसाय थाटला आहे. दारूविक्रेत्यांकडून नागरिकांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यासह, मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणे असे प्रकार सुरू आहेत.

ठळक मुद्देदारूविक्रेत्यांविरुद्ध एल्गार । पोलिसांनी पाच जणांना केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर जाम चौरस्ता येथे गेल्या ४ दिवसांपासून पारधी समाजातील ६ जणांनी गावठी दारूविक्रीचा व्यवसाय थाटला आहे. दारूविक्रेत्यांकडून नागरिकांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यासह, मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणे असे प्रकार सुरू आहेत. मात्र, पोलिसांकडून कुठलीही कारवाई केली जात नाही. दारूविक्रेत्यांच्या कृत्याविषयी पुष्पा विनायक कुबेकर मुलासह पोलिसांत तक्रार करायला गेल्या. मात्र, डायरी अंमलदार रूपचंद भगत यांनी तक्रार नोंदवून न घेता त्यांना परत पाठविले. मार्गावर दारूविक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शनिवारी शंभरावर संतप्त नागरिकांनी सरपंच, उपसंरपचासह पोलिसांना निवेदन सादर केले.जमावाच्या भावना लक्षात पोलिसांनी तत्काळ संघमित्रा पवार, अर्मपाल पवार, सुचिला पवार, आश्विनी काळे, मनोज काळे यांना अटक केली. मात्र, एक जण फरार होण्यास यशस्वी झाला.जाम येथील सरपंच सचिन गावंडे, उपसरपंच अजय खेडेकर, सदस्य राहुल पाटील, ग्रामपंचायत सदस्य सनी निवटे, गजानन मुंगसे, तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर किन्हेकर, विनायक कुबेकर, राणी कुमरे, वैष्णवी देवतळे, किशोर कुंभेकर, वृषभ किनकर, आदित्य मडावी, राहुल येनोरकर, हिरा सातरकर, नंदा मडावी, सोनू रामटेके, ज्योती कुभरे, निर्मला फाले यांच्यासह शेकडो नागरिकांनी डीबी पथकाचे अरविंद येनोरकर यांना निवेदन दिले.येथील पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेल्या ठाणेदाराचा दारूविक्रेत्यांवर कोणताही वचक नाही. त्यामुळे या व्यवसायाला उधाण आले आहे. पोलिसांचे दारूविक्रेत्यांना अभय असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.समुद्रपूर येथील गजानन महाराज मंदिर, जिल्हा परिषद शाळेच्या परिसरासह अन्य शालेय परिसरात राजरोसपणे दारूविक्री केली जात आहे. त्याचप्रमाणे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जाम, कानकाटी, नंदोरी, शेडगाव पाटी, वायगाव (गोंड) वायगाव (हळद्या) येथेही मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू व्यवसायाला ऊत आला आहे. नव्याने रुजू झालेल्या ठाणेदारांपुढे अवैध दारूविक्रीला आळा घालण्याचे आव्हान आहे. दारूविक्रेत्यांवरील कारवाईकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.या प्रकरणासंदर्भात कोणतीही माहिती नाही. वर्धा येथे महत्त्वाच्या बैठकीकरिता गेलो होतो. त्यानंतर लगेच १५ मिनिटांनी ११ तारखेला अतिक्रमण जागेवर वसलेल्या व्यक्तीची तक्रार आली होती. शनिवारी तातडीने पोलिसांना पाठवून पाच आरोपींना अटक केली. त्यांची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.हेमंत चांदेवार, ठाणेदार, समुद्रपूरया प्रकरणातील दारू व्यावसायिक विकी पवार हा मागील दहा दिवसां पासून आम्हाला पोलिसां धाक दाखवितो. पोलीस माझे आहेत, मी घरात घुसून मारेल, अशी धमकी देतो .रमा येनोरकर, महिला.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेMorchaमोर्चा