शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

राजगृहावरील तोडफोडीचे जिल्ह्यात संतप्त पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 05:00 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर मंगळवारी दोन अज्ञात समाज कंटकाकडून तोडफोड करण्यात आली. या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही तोडफोड करून राजगृहाच्या काचांवर दगडफेक करण्यात आली आहे. या घटनेचे जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले. याप्रकरणी राज्य सरकारने समाज कंटकांवर कारवाई करावी अशी मागणी विविध आंबेडकरी संघटनांकडून करण्यात आली आहे.

ठळक मुद्देठिकठिकाणी निदर्शने : आंबेडकरी संघटनांकडून कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/हिंगणघाट : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर मंगळवारी दोन अज्ञात समाज कंटकाकडून तोडफोड करण्यात आली. या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही तोडफोड करून राजगृहाच्या काचांवर दगडफेक करण्यात आली आहे. या घटनेचे जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले. याप्रकरणी राज्य सरकारने समाज कंटकांवर कारवाई करावी अशी मागणी विविध आंबेडकरी संघटनांकडून करण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए.) यांच्यावतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांच्या नेतृत्वात घटनेचा निषेध करण्यात आला. स्थानिक बजाज चौकाजवळ कार्यकर्त्यांनी एकत्रित होऊन वर्धा पोलीस ठाण्याला या संदर्भात निवेदन सादर केले. यावेळी समाधान पाटील, बाबा बडगे, सुनील वनकर, राजू थूल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.वंचित बहुजन आघाडी हिंगणघाटच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देवून या घटनेचा निषेध करण्यात आला. राजगृहावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना अटक करून कठोर शासन करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वंबआचे नेते डॉ.उमेश वावरे यांच्या नेतृत्वात उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे यांना निवेदन दिले. यावेळी मनीष कांबळे, दिलीप कहुरके, राजेश खानखुरे, प्रदीप डोळस, प्रमोद पाटील, दिक्षित वाघमारे, रमेश मानकर, आकाश हेडाऊ, महेंद्र वासेकर, शैलेंद्र नारनवरे, जीवन उरकुडे, सतीश जवादे, नितीन मैदलवार आदी उपस्थित होते.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए.) यांच्यावतीने हिंगणघाट येथे उपविभागीय अधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर हल्ला करणाऱ्या लोकांवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी रिपाइंचे अध्यक्ष शंकर मुंजेवार, दौलत मून, चंद्रशेखर दिक्षित, मोतीराम मून, राजू मेंढे, भीमराव कुुंभारे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.भूमिपुत्र संघर्ष वाहिनीतर्फे घटनेचा निषेधवर्धा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक वास्तू राजगृह या निवासस्थानी दोन समाज कंटकांनी तोडफोड केली. भूमिपुत्र संघर्ष वाहिनीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ या घटनेचा तीव्र निषेध करीत आंदोलन केले. या दोन माथेफिरूना त्वरित अटक करून शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आंदोलन भूमिपुत्रचे संयोजक रितेश घोगरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश घोगरे, प्रवीण काटकर, प्रमोद राऊत, सचिन घोडे, विवेक लोहकरे, पंकज इंगोले, प्रवीण पेठे, समीर राऊत, स्वप्नील किटे,अभिजीत कुत्तरमारे, वैभव राऊत, अर्चित निगडे, निशिकांत विरखेडे, सचिन गौरकर, प्रशिक कांबळे, महेंद्र मेश्राम, सुमित डेकाटे, मिलिंद निमिसडकर,मयुर भुजबळ आदी उपस्थित होते.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर