मनेका गांधी : अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिले निवेदनदेवळी : वर्धा येथील विकास भवनात केंद्रीय मंत्री मनेका गांधी बुधवारी आल्या असता अंगणवाडी सेविकांनी गळ्यात मागण्यांचे फलक लावून त्यांचे लक्ष वेधले. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने निवेदन सादर केले. यावेळी अंगणवाडी सेविका महत्त्वाचे काम करतात, त्यांना न्याय मिळेल, अशी ग्वाही ना. मनेका गांधी यांनी ुदिली.यावेळी खा. रामदास तडस व आ. पंकज भोयर यांच्यासह आयटक राज्य सचिव दिलीप उटाणे, शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन अध्यक्ष गजेद सुरकार, विजया पावडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. केंद्राने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याबाबत पक्षाने त्यांच्या जाहिरनाम्यात घोषणा केली होती. याची अंमलबजावणी करा, अंगणवाडी, आशा, शालेय पोषण आहार कर्मचारी यांना प्राँव्हिडंट फंड व आरोग्य सुविधा (ईएसआय) लागू करण्याची घोषणा केंद्र शासनाने केली आहे. त्याचा शासन आदेश काढा, अशी मागणी करण्यात आली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्ती ठरविण्यासाठी खासदार चंदेशकुमारी यांच्या अध्यक्षतेखालील ३१ महिला खासदार समितीने अहवाल (शिफारस) विधेयक २०१०-२०११ केंद्र सरकारला दिला ती शिफारस, अंगणवाडी, आशा व शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना जाहिर केलेले ३५० रुपये प्रतिदिन वेतन लागू करा, या मागण्या आहे. वंदना कोळणकर, मंगला इंगोले, मैना उईके, ज्ञानेश्वरी डंभारे, असलम पठाण, रेखा काचोरे, सुनंदा आखाडे, रंजनी पाटील बबीता चिमोटे, निर्मला सातपुडके, माला तितरमारे, शोभा सायंकार, मंगला अडसुले, सुभदा सोनकुसरे, दमयंती साखरकर, वैशाली तोटे, रमेश बोंदलकर, राजेश इंगोले, यांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)
अंगणवाडी कर्मचारी देशात महत्त्वाचे काम करतात
By admin | Updated: October 14, 2016 02:47 IST