शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल वापरताना अंगणवाडी सेविकांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 23:45 IST

अंगणवाडीचे कामकाज अधिक गतिमान आणि पेपरलेस करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारच्या ‘सही पोषण देश रोशन’ उपक्रमाअंतर्गत आय.सी.डी.एस, सी.ए.एस. या अ‍ॅपच्या माध्यमातून अंगणवाडीसेविकांंना नोंदी ठेवण्याकरिता मोबाईल संच पुरविण्यात आले आहेत.

ठळक मुद्देकामकाज गतिमान करण्यासाठी शासनाकडून मोबाईल संच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अंगणवाडीचे कामकाज अधिक गतिमान आणि पेपरलेस करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारच्या ‘सही पोषण देश रोशन’ उपक्रमाअंतर्गत आय.सी.डी.एस, सी.ए.एस. या अ‍ॅपच्या माध्यमातून अंगणवाडीसेविकांंना नोंदी ठेवण्याकरिता मोबाईल संच पुरविण्यात आले आहेत. यासाठी अंगणवाडीसेविकांना प्रशिक्षण दिले जात आहे. मात्र, पुरेशा शिक्षणाचा अभाव आणि अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल वापरताना उडणारा गोंधळ यामुळे कामकाज खरेच गतिमान होईल का, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे.शासनाकडून पुरविण्यात आलेल्या मोबाईलमध्ये कुटुंब व्यवस्थापन, दररोजचे पोषण-भरण, गृहभेट, वेळापत्रक, वाढीची देखरेख, घरपोच आहार, अपेक्षित कामाची यादी, अंगणवाडी केंद्राचे व्यवस्थापन, मासिक प्रगती अहवाल, किशोरवयीन मुली, समुदाय आधारित कार्यक्रम आदी १० अ‍ॅप आहेत. तालुक्यातील सर्वच अंगणवाडीसेविकांना मोबाईल संच देण्यात आले असून याद्वारे हे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे तालुक्यातील अंगणवाडी लवकरच स्मार्ट होणार आहे.पुढील महिन्यापासून अंगणवाडीचा कारभार हा आॅनलाईन नोंदणीद्वारे चालणार आहे. यामध्ये लसीकरण, गृहभेटी, बालकांच्या दैनंदिन नोंदी, स्तनदा माता, गरोदर माता आणि मुलीच्या आरोग्याच्या नोंदी असणार आहेत.आतापर्यंत अंगणवाडी सेविका दैनंदिन अहवाल आणि नोंद लिखित स्वरूपात रजिस्टरमध्ये ठेवतात. यामध्ये अंगणवाडीतील पूरक पोषण आहार, बालकाचे वजन उंचीची नोंद लसीकरण आदी नोंदी रजिस्टरमध्ये होत आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना आता रजिस्टर हाताने लिहिण्याची गरज राहणार नाही. कामकाज पेपरलेस होईल.अ‍ॅप समजत नसल्याने उडतो गोंधळअंगणवाडीचे कामकाज गतिमान होण्यासाठी राज्य शासनाकडून अंगणवाडी सेविकांना अ‍ॅन्ड्रॉइड मोबाईलचे वाटप जरी करण्यात आले असले तरी तालुक्यातील बालवाडीचे रूपांतर अंगणवाडीत करण्यात आल्याने बहुतांश अंगणवाडी सेविका या केवळ सातवी ते आठवी उत्तीर्ण असल्याने त्यांची मोबाईल वापरताना समजत नसल्याने प्रचंड दमछाक होत असून प्रचंड गोंधळ उडत आहे. यामुळे मोबाईलमुळे कामकाज खरेच गतिमान होणार काय, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल