शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

अन् नगराध्यक्षांनी केला महिला दिनाचा कार्यक्रम रद्द

By admin | Updated: March 9, 2016 03:04 IST

येथील नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीने जागतिक महिला दिनानिमित्त मंगळवारी एका सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

वर्धा पालिकेतील प्रकार : संतप्त नगरसेविकांनी नोंदविला निषेधवर्धा : येथील नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीने जागतिक महिला दिनानिमित्त मंगळवारी एका सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यासाठी निमंत्रण पत्रिका छापून वितरित करण्यात आल्या होत्या. या पत्रिकेमध्ये एका नगरसेविकेचे नाव नसल्याचा मुद्दा उचलून धरत नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे यांनी हा कार्यक्रमच रद्द केल्याचा आरोप इतर नगरसेविकांनी पालिकेत केला. या संतप्त नगरसेविकांनी निषेध नोंदवित महिलादिनी एका महिलेनेच महिलांचा अपमान केल्याची भावना व्यक्त केली.मात्र कार्यक्रम रद्द करण्यात आला नसून तो पुन्हा घेण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे यांनी सांगितले. महिला व बालकल्याण समितीच्यावतीने सभापती शीला गुजर, प्रकल्प अधिकारी ठाकरे व नगर सेविकांनी संयुक्तरित्या जागतिक महिला दिन सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी निमंत्रण पत्रिका छापून वितरित केल्या. या पत्रिकेमध्ये एका नगरसेविकेचे नाव नसल्याचे कारण पूढे करीत नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे यांनी हा कार्यक्रम रद्द केला. शिवाय कुणाचे नाव सुटले, हे देखील सांगितले नाही, असा आरोप शिला गुजर, माया उमाटे, राखी पांडे यांच्यासह अन्य नगरसेविकांनी केला. या कार्यक्रमाकरिता शहरातील विविध वॉर्डातून तसेच बचत गटाच्या महिला उपस्थित झाल्या होत्या; पण कार्यक्रमच रद्द केल्याने त्यांना परतावे लागले. पालिकेद्वारे आयोजित कार्यक्रम रद्द झाल्याने चुकीचा संदेश जात असल्याचेही नगरसेविकांचे म्हणणे आहे. वास्तविक, निमंत्रण पत्रिकेमध्ये नगरसेवक वा नगरसेविकांची नावे नाहीत. उद्घाटक म्हणून न.प. उपाध्यक्ष कमल कुलधरिया, अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे तर अतिथी म्हणून न.प. आरोग्य सभापती वर्षा खैरकार, शिक्षण सभापती भारती खोंड, बांधकाम सभापती माया उमाटे, पाणी पुरवठा सठापती शुभांगी कोलते तसेच मार्गदर्शक म्हणून डॉ. स्वाती गांधी, अ‍ॅड. अनिता ठाकरे, डॉ. शिवाली काशीकर यांची नावे असल्याचे त्यांनी सांगितले. विनीतमध्ये महिला व बालकल्याण सभापती शीला गुजर, उपसभापती गीता मसराम, न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांची नावे आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)